agriculture success story in marathi, okra market of agriculture market committee, pune | Agrowon

दुष्काळात शेतकऱ्यांना भेंडीने दिला आधार
संदीप नवले
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पाणीटंचाईच्या किंवा दुष्काळाच्या काळात अनेक शेतकरी कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांचा पर्याय शोधून त्यातून आर्थिक आधार घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजीपाला पिकांत भेंडीला वर्षभर मागणी असते. पुणे बाजार समितीत पुण्यासह शेजारील जिल्ह्यांतून सध्या दुष्काळी स्थितीत भेंडीची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे ठरू पाहत आहे.
 
बाजारात वर्षभर मिळणाऱ्या फळभाज्यांमध्ये भेंडीचे वेगळे महत्त्व आहे. या शेतमालाला
तशी वर्षभर मागणी असते. यंदा तर राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी

पाणीटंचाईच्या किंवा दुष्काळाच्या काळात अनेक शेतकरी कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांचा पर्याय शोधून त्यातून आर्थिक आधार घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजीपाला पिकांत भेंडीला वर्षभर मागणी असते. पुणे बाजार समितीत पुण्यासह शेजारील जिल्ह्यांतून सध्या दुष्काळी स्थितीत भेंडीची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे ठरू पाहत आहे.
 
बाजारात वर्षभर मिळणाऱ्या फळभाज्यांमध्ये भेंडीचे वेगळे महत्त्व आहे. या शेतमालाला
तशी वर्षभर मागणी असते. यंदा तर राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी
अनेक शेतकऱ्यांना आपल्या नेहमीच्या पिकांचे क्षेत्र कमी करण्याची वेळ आली आहे.
साहजिकच काही भाज्यांची आवक कमी होऊन दर वाढले आहे. भेंडीबाबत काहीसे असेच म्हणता येईल.

दुष्काळात भेंडीचे नियोजन

पाणीटंचाईची स्थिती ओळखून नगर, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा या भागांतील भेंडी उत्पादक उपलब्ध पाण्यात वार्षिक पिके न घेता दोन ते तीन महिने कालावधीच्या पिकांच्या लागवडीवर भर देत आहे. अनेक शेतकरी कोथिंबीर, पालक, शेपू अशा पालेभाज्यांकडे वळत आहेत. त्यामुळे फळभाज्यांच्या उत्पादनात व आवकेत घट होऊन दरामंध्ये वाढ होताना दिसत आहे. भेंडी हे दरांवर परिणाम झालेले प्रमुख पीक दिसत आहे. सध्या पुण्यातील गुलटेकडी बाजार समितीत भेंडीचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांपर्यत आहेत. किरकोळ विक्रेतेही व्यापाऱ्यांकडून खरेदी करून ग्राहकांना प्रतिकिलो ६० रुपयांच्या पुढील दराने विक्री करीत आहेत. थोड्याफार पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत भेंडीचा आधार मिळत आहे.

आर्थिक तोटाही झाला

यंदा जून ते ऑक्टोबर या काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे नगर, सोलापूर, नाशिक, जळगाव या भागांतील शेतकऱ्यांनी भेंडीची लागवड केली. उत्पादन सुरू झाल्यानंतर पुणे मार्केटमध्ये दररोज २०० ते २५० क्विंटल आवक होत होती. त्यामुळे दरामध्ये चांगलीच घसरण होऊन दर प्रतिकिलो १५ ते २५ रुपयापर्यंत खाली आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागला.

ऑक्टोबरनंतर दर वाढण्यास सुरवात

पावसाचे प्रमाण घटले. परतीचा पाऊसही आला नाही. पाणीटंचाई सुरू झाल्याने मार्केटमध्ये आवक कमी होऊ लागली. मग दरातही वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत भेंडीचे उत्पादन कमी होत असल्यामुळे बाजारात या फळभाजीची आवक तशीही कमी असते. त्यामुळे या शहरासह, ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडे बाजारांत किंवा सर्वसाधारण भाजी मंडईत या फळभाजीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. उन्हाळ्यातही संरक्षित पाण्याची सोय व ठिबक असलेल्यांना भेंडीचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे.

किफायतशीर पीक ः

शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात, की भेंडीचे पीक कोणत्याही जमिनीत, वाफ्यात, सरी वरंब्यावर घेता येऊ शकते. उसात किवा अन्य पिकांमध्ये त्याचे आंतरपीकही घेता येते. सध्या बदलत्या हवामानात आणि पाणीटंचाईच्या काळात तुषार किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करून आश्‍वासक उत्पादन किंवा उत्पन्न हाती लागू शकते. दहा ते पंधरा दिवसांच्या फरकाने टप्याटप्याने लागवड केल्यास काढणी सोपी होते. दरांचा फायदा घेता येतो. बाजारात चार ते सहा इंच लांब असलेल्या भेंडीला चांगली मागणी असते.

भेंडी मार्केट- ठळक बाबी

पुणे शहरातील ग्राहक व हाॅटेल व्यावसायिकांकडून भेंडीला चांगली मागणी

  • पुणे बाजार समितीत, नगर, सोलापूर, सुरत, जळगाव, नाशिक या भागांतून भेंडीचा पुरवठा
  • बाजार समितीत गेल्या वर्षी भेंडीच्या उलाढालीतून जवळपास ३७ कोटी रुपयांची उलाढाल
  • लागवडीनंतर सुमारे ४५ ते ५० दिवसांनंतर काढणीस सुरवात. वर्षभर मागणी असल्याने
  • शेतकऱ्यांकडून लागवडीस प्राधान्य
  • वर्षभरात किमान दोन हंगाम साधणे शक्य

शेतकरी अनुभव

मी पुणे बाजार समितीत भेंडी विक्रीस आणतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भेंडीची चार ते पाच एकरांवर लागवड करतो. यंदा पाणीटंचाईमुळे ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये एक एकरात लागवड केली. एकरी तीन किलो बियाणे लागले. सुमारे ४५ दिवसांनंतर तोडणी सुरू झाली. आत्तापर्यंत चार तोडे झाले आहेत. दरवर्षी एकरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळते. सध्या सरासरी प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे. खर्च वजा जाता एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देते. अर्थात हवामान व दरांवर खूप काही गणित अवलंबून असते.
नवनाथ गरुड- ९६०४०५५०५२
-
पुणे बाजार समितीत अलीकडील काळातील आवक
महिना ---आवक (क्विंटलमध्ये)
जून --- ५८२०
जुलै --- ६५२०
आॅगस्ट --- ८१७३
सप्टेंबर --- ६८९५
आॅक्टोबर --- ७५०९
नोव्हेंबर --- ६६६३
  
दहा ते पंधरा वर्षांपासून भेंडी लागवड करतो. यंदाही जून महिन्यात लागवडीची तयारी केली. परंतु, पुरेसा पाऊस न झाल्याने नियोजन साध्य झाले नाही. गेल्या वर्षी जून आणि ऑक्टोबरमध्ये वीस गुंठ्यांत लागवड केली होती. जून महिन्यात लागवड केलेल्या भेंडीला साधारणपणे १५ ते २५ रुपयांपर्यंत तर ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या भेंडीला ३५ ते ४० रुपये दर मिळाला. वर्षभर हे पीक घेतल्यास खर्च जाता सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
पप्पू कोंडे, कर्जत, जि. नगर

बाजारात नगर, सोलापूर, जळगाव या भागांतून दररोज भेंडी येते. पावसाळ्यात सुमारे २०० ते २५० क्विंटल आवक असते. त्यामुळे दर घसरून प्रतिकिलो १५ ते २५ रुपयांपर्यंत येतात. ऑक्टोबरनंतर १५० ते २०० क्विंटल आवक होऊन दर वाढून ते ४० ते ५० रुपयांपर्यंत जातात.
योगेश शिंदे, व्यापारी, बाजार समिती, पुणे
 
मी सात ते आठ वर्षांपासून पुण्यात किरकोळ भाजीपाला विक्री व्यवसाय करते. भेंडीला ग्राहकांकडून कायम मागणी असते. पावसाळ्यात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांप्रमाणे खरेदी करून ती पुढे २० ते २५ रुपयांनी विकावी लागते.
नीता धनंजय दळवी, किरकोळ विक्रेते
 
माझे बंधू गावी भेंडीचे उत्पादन घेतात. विक्री इथेच बाजार समितीत आम्ही करतो.
अन्य भाज्यांच्या तुलनेत या पिकातून किलोमागे चार ते आठ रुपये अधिक मिळतात.
अनिल घालमे
शेतकरी व व्यापारी, बाजार समिती, पुणे
संपर्क- ८७८८२०१७०२ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...
निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...
काळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...
दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...
संरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...
आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...
काळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...
यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...
स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
दुष्काळात कामी आले बहुविध पीक पद्धतीतील... नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी...