सुधारीत तंत्र आत्मसात केले हळदीचे उत्पादन वाढवले

लिंगा पेन येथे सुरेशराव देशमुख (उजवीकडून दुसरे) यांच्या शेतात हळदीतील तंत्र व्यवस्थापनाबाबत चर्चा करताना तज्ज्ञ व शेतकरी.
लिंगा पेन येथे सुरेशराव देशमुख (उजवीकडून दुसरे) यांच्या शेतात हळदीतील तंत्र व्यवस्थापनाबाबत चर्चा करताना तज्ज्ञ व शेतकरी.

विदर्भातील वाशीम जिल्ह्याची अोळख हळद पिकात ठळकपणे झाली आहे. सुधारीत तंत्रज्ञानातील विविध घटकांचा वापर, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन याद्वारे येथील शेतकऱ्यांना एकरी उत्पादनवाढ घेण्याबरोबरच हळदीची गुणवत्ताही वाढवणे शक्य झाले आहे. येत्या काळात शेतकरी कंपनी तसेच प्रक्रिया उद्योगाद्वारे पुढील वाटचाल त्यांनी सुरू केली आहे.   वऱ्हाडातील वाशीम जिल्हा सोयाबीन, हरभरा पिकांसाठी उत्तम समजला जातो. सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी या जिल्ह्यात आहेत. मात्र उत्पादकता कमालीची घटत चालल्याने शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने पीकबदलाला सुरवात केली. त्यांना हळदीतून नवा पर्याय सापडला.

हळद का ठरले हुकमी पीक?

  • शेतकऱ्यांमध्ये या पिकाविषयी वाढलेली जाणीवजागृती
  • वाशीमच्या कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) तांत्रिक मार्गदर्शनासाठी घेतलेला पुढाकार
  • होत असलेले बदल पूर्वीची हळद शेती

  • क्षेत्र सुमारे ६० ते ७० हेक्टर
  • सरी पाडून लागवड
  • लागवडीपूर्वी बेणेप्रक्रियेचा अभाव
  • खतांचा असंतुलित वापर
  • कीड-रोग व तणनियंत्रण व्यवस्थापनासाठी पद्धतीचा अभाव
  • सद्यस्थितीतील हळद शेती (केव्हीकेने दिलेले मार्गदर्शन)

  • क्षेत्र- सुमारे एक हजार हेक्टर
  • लागवडीसाठी सरी वरंबा पद्धतीचा वापर
  • शिफारशीत क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मिली अधिक कार्बेन्डाझीम (५० टक्के) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात बेणेप्रक्रिया
  • बहुतांश शेतकऱ्यांकडून ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर
  • माती परीक्षणाच्या अाधारावर एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीचा भाग म्हणून एकरी ८ ते १० टन शेणखत, तसेत सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश यासारख्या खतांचा लागवडीवेळी वा त्यापूर्वी वापर.
  • फर्टीगेशन
  • एकात्मिक कीड-रोग व तण नियंत्रण व्यवस्थापन
  • उत्पादन- एकरी, वाळवलेले पूर्वी - १७ ते १८ क्विंटल सुधारीत (हळद वाण-सेलम) - २२ ते २४ क्विंटल, कमाल ४० क्विंटलपर्यंत केव्हीकेने काय केले?

  • तज्ज्ञांचे बांधावर जाऊन मार्गदर्शन
  • नवनवीन तंत्र शिकवण्यासाठी केव्हीकेत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
  • कसबे डिग्रज (सांगली) येथील हळद शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन
  • बायर सेलर मीट स्पायसेस बोर्डच्या पुढाकाराने मुंबईत अलीकडेच बायर सेलर मीट झाली. त्याला वाशीम जिल्ह्यातील सुमारे २२ हळद उत्पादकांना केव्हीकेतर्फे पाठवण्यात आले. काढणीपश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धन या अनुषंगाने शेतकऱ्यांना अधिक ज्ञान देण्याचा त्यामागील हेतू होता. येत्या काळात प्रकल्प उभारून व्यावसायिक स्तरावर हळदीची पावडर व विक्री करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी उत्पादक कंपनीही स्थापन केली आहे. कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या जातींवर भर राहील. डॉ. अार. एल. काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम ७३५०२०५७४६

    हळद उत्पादकांचे अनुभव दरवर्षी सहा ते अाठ एकरांत हळद घेतो. अाठ वर्षांपूर्वी (पहिल्या वर्षी) बेण्यासाठी अोली हळद विकली. त्यावेळी चांगले पैसे झाले. दरवर्षी एकरी १८, २२ ते २४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतो. या पिकात अनेक वर्षांपासूनच सुधारीत तंत्राचा अवलंब करीत आलो आहे. केव्हीकेचे मार्गदर्शनही लाभले आहे. विक्रीसाठी वसमत हे मुख्य मार्केट आहे. अलीकडे घरूनच व्यापारी हळद घेऊन जातात. मुंबईत झालेल्या बायर-सेलर मीटला माझ्या मुलग्याला पाठवले होते. नवनवीन तंत्र माहित झाल्याशिवाय पुढे जाणे शक्य होत नाही.

    सुरेश बाबाराव देशमुख- ९०११९३७७१४ लिंगा पेन, ता. रिसोड, जि. वाशीम

    सन २००६ मध्ये अर्धा-एक एकरात लागवड करायचो. अाता तीन एकर क्षेत्र आहे. पूर्वी एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादकता होती. गेल्या वर्षी एकरी २४ क्विंटल उत्पादन झाले. किमान ३० क्विंटलपर्यंत उत्पादकता वाढवायची अाहे. बेडवर लागवड, ठिबकचा वापर, मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये, खतांचे चोख व्यवस्थापन यासोबतच अन्य शेतकऱ्यांचे अनुभव घेत हळदीचे व्यवस्थापन करीत अाहे. मुंबईतील बायर-सेलर मेळाव्यात वाशीम जिल्ह्यातील अाम्ही काही शेतकरी सहभागी झालो. भविष्यात सेंद्रिय पद्धतीने हळद पिकवली तर निर्यातीला वाव मिळणार अाहे.

    संजय मधुकरराव देशमुख- ९७६७६७१६१२ लिंगा पेन

    मांगूळ झनक येथील ज्ञानबा प्रल्हाद कोरडे मागील दोन हंगामांपासून हळदीकडे वळाले. त्यांनीही लागवडीपूर्वी खोल नांगरणी, वखरणी, दोन एकरांत २४ टन शेणखताचा वापर, सेलम जातीचे २० क्विंटल गट्टू बेणे आदींचा वापर केला. त्यांना एकरी २० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले आहे.

    संपर्क ः ज्ञानबा प्रल्हाद कोरडे- ९६०४०५२९०८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com