ट्रेंड भाजीपाला, फळे विक्रीचा...
वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017
चांदणी, मुखवट्याच्या
आकारात फळे, भाज्यांचे काप...
चांदणी, मुखवट्याच्या
आकारात फळे, भाज्यांचे काप...
भाजीपाला, फळ उत्पादक कंपन्या आपल्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी दरवर्षी विविध कल्पना राबवीत असतात. युरोप, अमेरिकेतील काही  कंपन्यांनी ताजा भाजीपाला, फळांचे काप विकण्यासाठी लहान मुलांचा आहारावर लक्ष केंद्रित केले आहे. एका फळे, भाजीपाला उत्पादक कंपनीने लहान मुलांच्या आहाराचा अभ्यास करून खास प्रकारचा भाजीपाला, फळांचे पॅकेट तयार केली. बहुतांश लहान मुले दररोज कच्चा भाजीपाला, फळे खाण्यास नाखूष असतात. परंतु त्यांच्या आरोग्यासाठी कच्चा भाजीपाला, फळे आहारात असणे महत्त्वाचे आहे. मुलांमधील खेळण्याची आवड लक्षात घेऊन कंपनीने फळे, भाजीपाल्याच्या चांदण्या, मुखवट्यांच्या आकारांत काप तयार केले. हे काप वैशिष्ट्यपूर्ण पॅकेट्समध्ये भरून बाजारपेठेत आणले. या उत्पादनाला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे भाजीपाला आणि फळांच्या मागणीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. खास लहान मुलांना समोर ठेवून रताळ्याचे कापही कंपनीने बाजारपेठेत आणले आहेत.
 
फ्रान्सच्या बाजारपेठेत
रवांडामधील अननस
फ्रान्समधील बाजारपेठेत वाळविलेल्या फळांच्या कापांना चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन आफ्रिका खंडातील रवांडा देशातल्या शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेने सेंद्रिय पद्धतीने अननसाच्या उत्पादनाबरोबरीने वाळविलेले काप फ्रान्सच्या बाजारपेठेत निर्यात करण्यास सुरवात केली. यामुळे अननस उत्पादनांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली.
रवांडामधील गहरा विभागातील १३३ अननस उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेचे सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी ९० हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने अननस लागवड केली आहे. सहकारी संस्थेने उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरीने फळांचे काप वाळविण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारले. या केंद्रामध्ये ताज्या अननसाचे काप केले जातात. शास्त्रीय पद्धतीने वाळवून चांगल्या पॅकिंगमध्ये भरले जातात. त्यामुळे हे काप वर्षभर टिकतात. दर महिन्याला दोन टन अननसाचे काप फ्रान्समध्ये निर्यात होत आहेत..
 
भाजीपाल्याचे नूडल्स...
अमेरिकेतील ग्राहकांकडून नूडल्सला चांगली मागणी आहे. पारंपरिक चवीच्या नूडल्स बनविण्यापेक्षा एका कंपनीने भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा वापर करत आरोग्यदायी नूडल्स हा प्रकार बाजारपेठेत आणला. या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगलीच मागणी वाढली. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत शाकाहारी खाद्य पदार्थांची बाजारपेठ विस्तारत आहे. ही संधी लक्षात घेऊन कंपनीने ग्राहकाच्या मागणीनुसार त्याच्या आवडीच्या भाजीपाल्याचा स्वाद असलेल्या नूडल्स  बाजारपेठेत आणल्या आहेत.

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीरजमिनीत चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा...
तासाचे काम ७ मिनिटांत करणारा ‘पेपरपॉट...जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी...
भूमिगत निचरा पाइपची योग्य खोली आवश्‍यकक्षारपड व पाणथळ जमिनीतून पाण्याचा निचरा...
सोलर वॅक्स मेल्टरमेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण...
ट्रेंड भाजीपाला, फळे विक्रीचा...चांदणी, मुखवट्याच्या आकारात फळे, भाज्यांचे...
सेन्सरद्वारे अोळखता येते सिंचनाची नेमकी...वनस्पती आधारित सेन्सरच्या साह्याने पानांची जाडी...
मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणालीकोची (केरळ) ः येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य...
पेरणी ते काढणी यंत्राद्वारे ८० एकर...गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भात पिकातील आंतरमशागतीसाठी कोनोविडर...भात पिकाची आंतरमशागत चिखलातच करावी लागते. त्याला...
शेवग्यापासून बनवा विविध मूल्यवर्धित...शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते....
केंद्रेकर यांच्या प्रयत्नांमुळे...पुणे : राज्यातील ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या...
बावीस एकरांत शंभर टक्के ‘ड्रीप अॅटोमेशन’नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव...
स्ट्रॉबेरी फळांवरील घरगुती प्रक्रियास्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक असले तरी अलीकडे...
कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग यंत्र...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
स्वस्तात बनविला छोटा पॉवर टिलरपाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे...
साबळे यांची १६० एकरांवरील यांत्रिकी...शेती, मग ती अल्प असली तरी महागाईच्या व...