agriculturre news in marathi, agriculture goods mortgage scheme status, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४० लाखांचे कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018
परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २०१७-१८ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत ३७ शेतकऱ्यांना ४० लाख ४७ हजार ७६३ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २०१७-१८ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत ३७ शेतकऱ्यांना ४० लाख ४७ हजार ७६३ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या स्थितीत शेतीमाल तारण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतीमाल तारण ठेवून त्यावर कर्ज उचलून आर्थिक गरजा पूर्ण करता येतात. बाजारातील शेतीमाल दरात वाढ झाल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबवली जात आहे.
 
२०१७-१८ या आर्थिक वर्षात बाजार समितीने ३७ शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यामध्ये २० शेतकऱ्यांना सोयाबीन तारण ठेवून २४ लाख १७ हजार ९३० रुपये, १० शेतकऱ्यांना तूर तारण ठेवून ६ लाख ३० हजार ५८५ रुपये, ७ शेतकऱ्यांना हरभरा तारण ठेवून ९ लाख ९९ हजार २१८ रुपये असे एकूण ४० लाख ४७ हजार ७६३ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
 
गतवर्षी मार्चअखेरपर्यंत १३ शेतकऱ्यांना तूर, मूग, सोयाबीन हा शेतमाल तारण ठेवून ३ लाख ७ हजार ५०० रुपये कर्ज देण्यात आले होते. यंदा शेतीमालाचे बाजारभाव हमी दरापेक्षा कमी असल्यामुळे शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

इतर ताज्या घडामोडी
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...