agricuture news in marathi, jaggery is not in MSP list | Agrowon

गुळाचा शेतीमाल तारण योजनेत समावेश केवळ मृगजळ?
राजकुमार चौगुले
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर : गुळाचा शेतीमाल तारण योजनेत समावेश करण्याबाबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनुकूलता दाखविली असली, तरी ही योजना राबवायची कशी याबाबत शासनाकडे सध्या काहीच माहिती नसल्याचे चित्र आहे. शेतीमाल तारण योजना ठरविताना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवावी लागते. ही किंमत गृहीत धरूनच पुढील सगळे व्यवहार करता येतात. पण मुळात गूळ हा प्रकार किमान आधारभूत किंमत शेतीमाल यादीच नसल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : गुळाचा शेतीमाल तारण योजनेत समावेश करण्याबाबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनुकूलता दाखविली असली, तरी ही योजना राबवायची कशी याबाबत शासनाकडे सध्या काहीच माहिती नसल्याचे चित्र आहे. शेतीमाल तारण योजना ठरविताना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवावी लागते. ही किंमत गृहीत धरूनच पुढील सगळे व्यवहार करता येतात. पण मुळात गूळ हा प्रकार किमान आधारभूत किंमत शेतीमाल यादीच नसल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आधारभूत किंमत ठरविणार कशी?
गूळ हा प्रक्रियायुक्त शेतीमालामध्ये गणला जातो. यामुळे सुरवातीपासूनच या व्यवसायाकडे राज्याबरोबर केद्र स्तरावरूनही फारसे प्रयत्न झाले नाहीत. पण अनेक शेतकरी या व्यवसायावर अवलंबून असल्याने याकरिता बाजार समिती व प्रशासनाच्या वतीने काही प्रयत्न सुरू झाले असले, तरी त्याबाबतीत कोणतीच स्पष्टता नाही. आधारभूत किंमत ही केंद्राच्या अख्यात्यारीत येते. यामुळे ही किंमत ठरविण्याबाबत राज्य शासन नेमके करणार काय, याबाबतही स्पष्टता नसल्याने सध्या तरी हा विषय केवळ चर्चेपुरता राहिला आहे. 

सध्या स्थानिक ठिकाणी शीतगृह उभारणीबाबत बाजार समिती हालचाली करीत आहे. शेतीमाल तारण योजना राबविण्यासाठी शेतीमाल योग्य स्थितीत ठेवण्याची गरज असते. गूळ हा नाशवंत पदार्थ आहे. गूळ तयार झाल्यानंतर प्रत्येक दिवसागणिक गुळाची चव व रंग बदलला जातो. यामुळे जरी गुळाचा या योजनेत समावेश केला, तर ही बाब कशी हाताळणार हेही कोडेच आहे. गुळाच्या दर्जाबाबतीतली ही संवेदनाता पाहून अनेक स्थानिक व्यापाऱ्यांनी जिथे विकणार आहे तिथे म्हणजे गुजरातच्या बाजारपेठेत शीतगृहे उभारली. यामुळे शीतगृहातून बाहेर काढला की तिथेच गूळ विकला गेल्याने नुकसान होत नाही, असा अनुभव व्यापाऱ्यांचा आहे. स्थानिक बाजारपेठच नसेल तर स्थानिक ठिकाणी शीतगृह उभारले आणि बाहेरच्या राज्यात तो विक्रीसाठी पाठविला, तर त्याचा दर्जा खराब होण्याची शक्‍यताही आहे. यामुळे शीतगृह कुठे असावे याबाबतीही मतभिन्नता आहे.

आश्‍वासने उदंड झाली
गेल्या अनेक वर्षांपासून गुळाचा व्यवसाय आतबट्ट्यात येत आहे. यामुळे प्रत्येक वर्षी गुऱ्हाळच्या संख्येत लक्षणीय घट येत आहे. सातत्याने वाढणाऱ्या कच्या मालाच्या किमती, मनुष्यबळाचा अभाव आणि त्यातुलनेत दरात होणारी घसरण गूळ तयार करण्याच्या प्रयत्नाला खीळ घालत आहे. गुळाचा विषय निघाला की केवळ कोल्ड स्टोअरजेचाच विषय चर्चेत येतो आणि कालांतराने कारभारी बदलले की मागे पडतो. यामुळे केवळ चर्चाच होत असल्याने गूळ उत्पादकांत प्रचंड संताप आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...