सोलापुरात २१ हजार शेतकरी अजूनही रांगेत

माझे आणि आईचे खाते कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. आमच्या गावानजीकच्या कामती, कोरवली, सय्यद वरवडे ही सगळी महा-ई-सेवा केंद्रे फिरून झाली, सर्व्हर डाउनची समस्या, रांगा संपलेल्या नाहीत. अजूनही नंबर आलेला नाही. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळण्याची गरज आहे. - सुरेश वाले, शेतकरी, वटवटे, ता. मोहोळ.
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया

सोलापूर  ः सर्व्हर डाउनची समस्या, कागदपत्रांची अपूर्तता यांसह अनेक तांत्रिक अडचणींमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २१ हजार २१३ शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचे अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहेच; पण सरकारकडून सातत्याने बदलत गेलेले निकष आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे, यावर मुदतवाढ हाच एकमेव उपाय आहे, असेही शेतकरी म्हणतात.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दोन लाख ४५ हजार ६३४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन लाख २४ हजार ४२१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत; पण अजूनही सुमारे २१ हजार शेतकरी रांगेत आहेत. त्यातच ही मुदत अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुदतवाढ न मिळाल्यास हे शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com