राज्यात पावसाची धुवाधार बॅटींग

छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे.पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, धानपट्ट्यालाही फायदा झाला आहे. शिवाय तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
राज्यात पावसाची धुवाधार बॅटींग
राज्यात पावसाची धुवाधार बॅटींग

पुणे : राज्यात सर्बदूर मुसळधार पावसाने आज हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणापर्यंत पावसाच्या हजेरीने वातावरण ढवळून निघाले. वऱ्हाडातील नद्यांना पूर आले. गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे. पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, धानपट्ट्यालाही फायदा झाला आहे. शिवाय तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपुर, मलकापुर, मोताळा तालूक्यात तर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्यात जोरदार वृष्टी झाली. अकोला तालुक्यात तीन मंडळात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद झाली. सातपुडा पर्वत रांगामधून वाहणाऱ्या बहुतांश नद्यांना पूर अाले. नागपूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमितपणे पावसाच्या सरी पडताहेत. मंगळवारीदेखील सकाळी दोन-अडीच तास संततधार बरसला. हवामान विभागाने शहरात सकाळी साडेआठपर्यंत १७.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. विदर्भात अकोला ६६.२ मिलिमीटर, ब्रम्हपुरी ६४.४ मिलिमीटर, गोंदिया ३३.८ मिलिमीटर, वर्धा २४.६ मिलिमीटर पाऊस झाला.   मराठवाड्यातील सेलू (जि.परभणी) तालुक्यात अतिवृष्टीने दुधना, कसूरा नदीला पूर आला. वालूर-सेलू, वालूर - मानवत रोड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. वाहतूक काही काळ बंद होती. जालना तालुक्यातील साळेगाव येथे मुसळधारमुळे घर कोसळले, रात्री 1 वाजता घडली घटना, तीन जण जखमी झाले. जखमींवर जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील चारी मंडळात २९४ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी मुसळधार सुरू होती. मुंबईला पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या पावसाबाबत सोशल नेटवर्किंगवर अनेकजण माहिती टाकत असून, घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तर बाहेर पहा अन्यथा घरातच थांबा, असा सल्लाही अनेकजण देत आहेत. मुंबईमध्ये सोमवारी (ता. 28) रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुंबईकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र विविध भागात दिसत होते. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे मध्यमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील २४ धरणापैकी १० धरणं १०० टक्के भरली. सहा धरणात ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, उर्वरित आठ धरणं ६० ते ९० टक्के भरली. कऱ्हाड ः कोयना परिसरात काल रात्रीपासून  झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात ३.५६ टिएमसीने वाढ झाली. काल दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची उंची तब्बल दोन फुटाने वाढली. परवापेक्षा कोयनेला १२५, नवजाला १५० तर महाबळेश्नरला ८३ मिलीमीटर जास्त झाला आहे. त्यामुळे चोवीस तासात कोयनेने ९५ टिएमसीचा टप्पा ओलांडला आहे. आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाची रिमझीम सुरू आहे.  पुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास ५५ हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी १२ वाजता उजनी (सोलापूर) धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून ४०० तर बोगद्यातून ५० क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून ४२ हजार ६२७ क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com