पहिले स्वतःला द्या

तुम्ही लहानपणापासून `सर सलामत तो पगडी पचास` ही म्हण हजार वेळा एेकली असेल. तुम्ही सक्षम नाही झालात तर उर्वरित कर्जाची रक्कम फेडण्यासाठी लागणारी ताकद तुमच्याकडे येणार कशी? कर्ज फेडलेच पाहिजे, पण त्याबरोबर तुम्हीही सक्षम होणे गरजेचे आहेच की. म्हणूनच मी नेहमी सांगतो की `स्वतःला पहिले द्या.`
AGRO MONEY
AGRO MONEY

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ही उक्ती कोणतेही काम करताना लक्षात ठेवली पाहिजे. कर्जमुक्ती किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी `पहिले स्वतःला द्या` ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. पण याचा अर्थ असा नाही की आलेले सर्व पैसे स्वतःवरच खर्च करावेत. असं करणं म्हणजे मोठ्ठं संकट ओढवून घेण्यासारखं आहे. चला तर मग, `पहिले स्वतःला द्या` ही संकल्पना काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही एवढे तरी जाणले असेल की, तुम्हाला तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या घाणीतून बाहेर पडणं बंधनकारक आहे. पण तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती पण मजबूत करायची आहे, ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरता कामा नये. यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे- तुम्ही कमावलेल्या पैशामधून सर्वप्रथम तुमच्याकडे पैसा आला पाहिजे. परंतु आपलं होतंय काय की, `कमावलेला/तुमच्याकडे आलेला पैसा हा पहिले दुसऱ्यांना देण्यात धन्यता मानता व तुमच्या स्वतःसाठी काही शिल्लक राहील याची फक्त इच्छा बाळगता. या बाबतीत बहुतांश लोकांची परिस्थिती ही अशीच असते. याचं एकमेव कारण म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असतं, याचा तुम्ही कधी प्राधान्याने विचारच केलेला नसतो. तुम्ही लहानपणापासून `सर सलामत तो पगडी पचास` ही म्हण हजार वेळा एेकली असेल. तुम्ही सक्षम नाही झालात तर उर्वरित कर्जाची रक्कम फेडण्यासाठी लागणारी ताकद तुमच्याकडे येणार कशी? कर्ज फेडलेच पाहिजे, पण त्याबरोबर तुम्हीही सक्षम होणे गरजेचे आहेच की. म्हणूनच मी नेहमी सांगतो की `स्वतःला पहिले द्या.` या संकल्पनेनसार तुम्ही दरमहा, किंवा शेतकरी मित्रांच्या बाबतीत त्यांचे पीक विकल्यानंतर आलेला पैसा यापैकी काही भाग हा बाजूला काढून ठेवला पाहिजे. उदा: १०% किंवा २०%. जर तुम्ही व्यासायिक असाल किंवा शेती करत असाल तर तुम्हाला दरमहा उत्पन्न येत नसते. तेव्हा ज्या ज्या वेळी तुमच्याकडे किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसा येतो त्या त्या वेळेस वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुवतीनुसार १० किंवा २०% पैसा बाजूला काढून ठेवला पाहिजे. आता ही बाब वाचत असताना मला १०० टक्के खात्री आहे की तुमच्या डोक्यामध्ये एक भुंगा आला आहे, जो जोरजोरात तुम्हाला सांगतोय की, इथे खायला पैसा शिल्लक राहत नाही, मग १०% बाजूला कुठून काढणार. पण मित्रांनो, मी इथे हेच सांगतोय की आलेली रक्कम खर्च होण्यापूर्वी स्वतःसाठी १०% बाजूला काढा. बाजूला काढलेली रक्कम दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. पैसा पैशाला जोडतो. आज तुम्ही बाजूला काढलेली १०% रक्कम हळूहळू मोठी होईल. हीच रक्कम तुम्ही एखादं कर्ज पूर्ण फेडण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरू शकता. पैसा शिल्लकच राहत नाही हा भुंगा अजूनही तुमच्या डोक्यातून गेलेला नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. परंतु उद्या तुमच्याकडे आजच्या पेक्षा दुप्पट पैसा आला, तरीही तुमच्याकडे पैसा शिल्लक राहणार नाही. किंवा आज जर काही कारणास्तव पैसा कमी आला तरी तुम्ही आलेल्या पैशातच सगळं भागवणार आहातच की. तेव्हा दर महिन्याला किंवा ज्यावेळी तुमच्याकडे पैसा येतो त्यावेळी १० % कमी आला असं समजून राहिलेल्या ९० % पैशातच सर्व भागवून टाकलं पाहिजे. शिल्लक ठेवलेला १०% पैसा गुंतवणूक करून त्यावर पैसा मिळवायला सुरू करायचा. सुरवातीला ही रक्कम खूपच छोटी वाटेल. पण हळूहळू ओघ वाढून रक्कम मोठी होत जाईल. थेंबे थेंबे तळे साचे हे इथंही लागू होतं.  तुम्ही दरमहा किंवा पैशाच्या प्रत्येक आवकेपैकी किती टक्के बाजूला काढताय याला महत्त्व नाही. सुरवात करण्यासाठी तुम्ही तुमच्या कमाईच्या ५% नेसुद्धा सुरू करू शकता. महत्त्वाचे हे आहे की तुम्हाला नियमितपणे पैसा बाजूला काढण्याची सवय लागेल. हीच चागली सवय तुम्हाला पुढील काळामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल व तुम्ही कर्जमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू कराल. याच चांगल्या सवयीमुळे मी स्वतः कर्जातून बाहेर पडलो आहे. तेव्हा तुम्ही पण नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता. गरज आहे ती फक्त वरील संकल्पना काटेकोरपणे राबवण्याची. 

- सुधीर खोत  : ९८५०८४०९५३       www.sudhirkhot.com (लेखक ‘फायनान्शिअल फिटनेस` या फर्मचे संचालक आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com