पुण्यात शेतकऱ्यांचा "जय हो!' पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा आवकेबरोबर तत्काळ वजन आणि खुल्या लिलाव पद्धतीस पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती (गुलटेकडी) प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या 31 तारखेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर व त्यानंतर नियमितपणे आवकेबरोबर वजन करण्यात येणार असून, या पद्धतीतील संभाव्य अडथळे दूर करून एक एप्रिलला कायद्यानुसार अंतिम निर्णय बाजार समिती जाहीर करेल, अशी माहिती प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिली. |