agrowon marathi agralekh on climate change | Agrowon

सावधान! हवामान बदलतेय
विजय सुकळकर
सोमवार, 26 मार्च 2018

हवामान बदलाचे सर्वाधिक फटके भारताला बसतील, असे यापूर्वीसुद्धा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितले आहे. याचा प्रत्यय आपणास सध्या येत असून त्याकडे शासन-प्रशासन डोळेझाक करतेय.

भारत हा हवामान बदलास जगात सर्वांत जास्त संवेदनशील देश असून, त्याचा मोठा फटका शेती क्षेत्राला बसेल, अशा इशारा एचएसबीसी बॅंकेने दिला आहे. खरे तर हवामान बदलाचे सर्वाधिक फटके भारताला बसतील, असे यापूर्वीसुद्धा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितले आहे. याचा प्रत्यय आपणास सध्या येत असूनसुद्धा त्याकडे शासन-प्रशासन डोळेझाक करतेय, ही बाब अधिक गंभीर म्हणावी लागेल. मागील पावसाळ्यात देशातील अर्ध्या भागाला महापुराचा तडाखा बसला, तर अर्ध्या भागात कमी पाऊसमान झाल्याने पिकांची उत्पादकात घटली आहे. त्यानंतर हिवाळ्यामधील धुके, धुई, कधी अत्यंत कमी; तर कधी फारच जास्त थंडीने रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान केले.

आता उन्हाळ्यात दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठ्या फरकाने फळे-भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होतोय. पहाटे गारठा, तर दुपारी उन्हामुळे फळपिकांवर अनेक रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाचे मोठे खंड, ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिके उद्‌ध्वस्त होत आहेत. याचा अर्थ असा होतो, की भविष्यात शेतीचे भवितव्य धोक्यात येणार असून, त्याची सुरवात झाली म्हणावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये हवामान बदलाचा बारकाईने अभ्यास करून त्यावर उपाय योजना करायला हव्यात. 

हवामान बदलाचे सर्वाधिक चटके हे जिरायती शेतीला बसत असतात. आपल्या देशात जिरायती शेतीक्षेत्र सुमारे ६० टक्के, तर राज्यात ते ८२ टक्के आहे. मागील काही वर्षांपासून वाढते तापमान आणि कमी झालेल्या पावसाने जिरायती शेती संकटात आहे. मागच्या तिन्ही हंगामात हवामान बदलाने शेतीचे नुकसान वाढले. आगामी खरिपावरसुद्धा सध्यातरी अनिश्चिततेचे सावट आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज अमेरिकेच्या हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. भारतीय हवामानतज्ज्ञांनी मात्र यंदाच्या मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव पडणार नसल्याचे सांगितले आहे. हवामानाच्या बाबतीत जागतिक हवामानाचे जसे स्थानिक परिणाम असतात, तसेच स्थानिक हवामानाचेसुद्धा जागतिक परिणाम असतात. आपला कल मात्र जागतिक हवामानकडेच अधिक असून, अंदाजामध्ये स्थानिक घटकांचासुद्धा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

सध्या अल्पकालीन हवामानाचे आपले अंदाज बऱ्यापैकी खरे ठरताहेत. परंतु, बदलत्या हवामान काळात शेतीचे नुकसान होणार नाही किंवा कमीत कमी नुकसान होईल, अशा निविष्ठा आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आता उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याकरिता देशातील हवामान तज्ज्ञ आणि कृ.िषतज्ञ्जांना एकत्र काम करावे लागेल. दीर्घकालीन हवामानाचे अचूक अंदाज, त्यात विभागनिहाय पाऊस, खंड, अवकाळी पाऊसमान कधी, केव्हा, कसे राहील, याची माहिती हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना मिळायला हवी. त्यानुसार पिकांची आणि त्यांच्या वाणांची निवड कशी करायची, लागवड तंत्रात काय बदल करायचे, हे शेतकऱ्यांना सांगावे लागेल. बदलत्या हवामानानुसार आपले कृषी संशोधन वाढवून त्याद्वारे विविध पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवावे लागतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवताना उत्पादन घटीच्या सर्वांत परिणामकारक हवामान बदल या घटकाकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होता कामा नये.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...