agrowon marathi agralekh on ht cotton seed | Agrowon

अवैध बियाण्यांचा करा बीमोड
विजय सुकळकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
एचटी कापूस बियाण्यांचा देशात बेकायदेशीर प्रवेश हा केंद्र - राज्य शासनांसह देशातील सर्व संशोधन संस्था, आयसीएआर, जीईएसीसारख्या नियामक संस्थांना एक धडाच म्हणावा लागेल.

मागील खरीप हंगामात अवैध ‘एचटी’ (हर्बीसाइड टॉलरंट अर्थात तणनाशक सहनशील) कापसाच्या वाणांनी राज्यात नव्हे, तर देशभर धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक आदी कापूस उत्पादक राज्यांमध्ये एचटी वाणांची लाखो बियाणे पाकिटे विकली गेली. संकरित बीटी कापूस बियाणे पाकिटाची किंमत ८०० रुपये असताना एचटी बियाण्यांचे एक पाकीट १३५० रुपयांनी विक्री करण्यात आले. अवैध एचटी बियाण्यांचा हा काळाबाजार ४७२ कोटींवर असल्याचे दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राने स्पष्ट केले आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे कापसासह सोयाबीन, मोहरी या पिकांचीही एचटी वाणं अवैधरित्या देशात दाखल झाल्याचे काही तज्ज्ञ सांगतात. एचटी कापसाच्या लागवडीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संशोधन संस्था, कृषी विभागातील अधिकारी आणि बियाणे कंपन्या सारेच एकमेकांकडे बोट दाखवित होते. त्या वेळी एचटी बियाण्यांची देशात एवढी व्याप्ती कृषी विभाग आणि नफेखोर कंपन्या यांच्या मिलीभगतशिवाय शक्य नाही आणि त्यास राज्यकर्त्यांचाही ‘अर्थ’पूर्ण पाठिंबा असल्याचे ॲग्रोवनने स्पष्ट केले होते. अगदी तंतोतंत तसाच अहवाल केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) राज्य सरकारला सादर केला आहे. एचटी बियाण्याचा राज्यात शिरकाव कृषी खात्याचे अधिकारी आणि बियाणे कंपन्यांच्या संगनमताने झाला असून, हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खरे तर बोगस, अवैध बी-बियाणे, खते, कीडनाशकांवर प्रतिबंध घालून दर्जेदार निविष्ठांचाच शेतकऱ्यांना पुरवठा व्हावा, याकरिता निविष्ठा गुण नियंत्रण विभाग राज्यात कार्यरत आहे; परंतु या विभागाचे शेती निविष्ठांवर काहीही नियंत्रण नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. बोगस, भेसळयुक्त निविष्ठांच्या पुढचा टप्पा म्हणजे देशात ज्या वाणांस, बियाण्यास कायदेशीर परवानगीदेखील नाही, अशी वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत. काही बौद्धिक दिवाळखोर एचटी वाणं शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत, हे सांगताहेत. येथे प्रश्न फायद्या-तोट्याचा नसून या वाणांचा देशात शिरकावच कसा झाला हा असून, देशाची जैवविविधता, पर्यावरण, मानवी आरोग्य यांच्या सुरक्षिततेचा आहे. आणि हे असेच चालू राहिले तर जगभरातील कोणतेही तंत्र, नवीन वाणं (मग ते घातक असो की नसो) घुसखोरी करूनच पाठवायचे, कशाला कायदेशीर परवानगी, रितसर चाचण्यांच्या भानगडीत वेळ वाया घालवायचा, असा चुकीचा संदेश नफेखोर कंपन्यांना मिळेल. त्यामुळे जे अवैध, बेकायदेशीर आहे, त्यास आळा बसायलाच हवा.

आयबीने स्पष्ट अहवाल दिलाच आहे. राज्य शासनाने त्यातील सर्व धक्कादायक बाबींची कसून चौकशी करायला हवी. यात जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे. असे झाले तरच तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरी घुसखोरी करणाऱ्यांना चाप बसेल. एचटी कापूस बियाण्यांचा देशात बेकायदेशीर प्रवेश हा केंद्र - राज्य शासनांसह देशातील सर्व संशोधन संस्था, आयसीएआर, जीईएसीसारख्या नियामक संस्था यांना एक धडाच म्हणावा लागेल. यातून शिकून येथून पुढे त्यांनी असे तंत्र देशात चुकीच्या मार्गाने प्रवेश करणार नाही, याची पूर्णतः खबरदारी घ्यायला हवी. असे झाले तरच या देशातील शेती आणि जैवसंपदा सुरक्षित राहील, अन्यथा नाही.

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...