agrowon marathi agralekh on soybean import | Agrowon

सोयाबीन आयात घातकच
विजय सुकळकर
गुरुवार, 29 मार्च 2018

आपली सोयाबीन ढेप नॉन जीएम असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रीमियम दर आहेत. आता आपणच सोयाबीन आयात करू लागलो, तर ढेपेला मिळणारी प्रीमियम दराची संधी आपण गमावून बसू.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (२०१७-१८) सोयाबीनचे उत्पादन थोडे कमी झाले आहे. असे असतानादेखील एेन काढणीच्या हंगामात सोयाबीन दराने नीचांकी पातळी गाठली होती. सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असताना ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये १४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल (सरासरी जेमतेम २००० रुपये) दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागले. पुढे जानेवारीमध्ये दरात थोडी सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३००० रुपयांवर गेले होते. त्या वेळी देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड पाहता सोयाबीनचे दर ३५०० रुपये क्विंटलच्या पुढे जातील, असे संकेत ॲग्रोवनने दिले होते आणि घडलेही तसेच. सध्या बाजारात सोयाबीनचे दर ३६०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. अशावेळी आफ्रिकी देशांतून सुमारे एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचे करार भारतीय आयातदारांनी केले आहेत. आयातीचे सोयाबीन देशांतर्गत उपलब्ध सोयाबीनपेक्षा स्वस्त असल्याने आयातदारांचा कल सोयाबीन बाहेरून आणण्याकडेच दिसून येतो. त्यामुळे आयातीच्या सोयाबीनने देशांतर्गत साठ्यात वाढ होणार आहे, बाजारात तेवढे सोयाबीन उतरल्याने देशांतर्गत किमतीवर दबाव निर्माण होऊन पुढे दरवाढीची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

मागील खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड आणि काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने सोयाबीनची उत्पादकता तर घटली; परंतु दर्जाही खालावल्याने अत्यंत कमी दर मिळाला. असा दुहेरी फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन ठेवले त्यांच्या पदरीही आता निराशाच पडेल. सोयाबीनच्या आयातीने सध्याच्या दरात फारसा फरक पडणार नसला तरी याचे दुरगामी परिणाम मात्र गंभीरच असणार आहेत. भारत वगळता जगात बहुतांश सोयाबीन हे जीएम (जनुकीय मॉडिफाइड) आहे. त्यामुळे असे सोयाबीन आयातीस देशात परवानगी नाही. आता नॉन जीएम सोयाबीनलाच आयातीस परवानगी असली तरी त्या आडून जीएम सोयाबीनची आयात देशात होऊ शकते. यापूर्वी जीएम तेलबियांपासून उत्पादित खाद्यतेल देशात येऊन पोचले आहेच. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनचे दर हे त्यातील तेलाचे प्रमाण नाही, तर ढेप ठरविते. आपली सोयाबीन ढेप नॉन जीएम असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रीमियम दर आहेत. आता आपणच सोयाबीन आयात करू लागलो तर ढेपेला मिळणारी प्रीमियम दराची संधी आपण गमावून बसू. पुढील हंगामातील सोयाबीनचे दर आपल्या येथील पाऊसमान, देशांतर्गत सोयाबीनचा पेरा, अमेरिकेतील हवामान, तेथील उत्पादन, चलन दर यावर ठरतील, हे खरे आहे; परंतु सोयाबीनची आयात आपण खुली केल्यामुळे पुढच्या हंगामात जागतिक बाजारात सोयाबीनचे दर कमी असतील तर तेव्हाही आयातदारांचा कल सोयाबीन आयातीकडे असेल. त्या वेळी देशांतर्गत सोयाबीनला मागणीही राहणार नाही आणि योग्य दरही मिळणार नाहीत. आपली खाद्यतेल सुरक्षा आणि कोंबड्यांचे खाद्य या दोहोंसाठी सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. मुळातच घटती उत्पादकता आणि कमी दरामुळे शेतकरी सोयाबीनकडे पाठ फिरवित आहेत. सोयाबीनच्या वाढत्या आयातीने दराचीही शाश्वती नसेल तर हे पीक घेणार कोण? हा लाख मोलाचा सवाल आहे.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...