agrowon marathi agralekh on TEMPERATURE INCREASE | Agrowon

असह्य चटके व्हावेत सुसह्य
विजय सुकळकर
सोमवार, 5 मार्च 2018
२० व्या शतकाच्या मध्यापासून झालेली जास्तीत जास्त तापमानवाढ ही मानवनिर्मित हरितगृह वायूच्या वाढीमुळे झाल्याचे आढळते. तापमानवाढीचा हा इतिहास पाहता याकडे आपले सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

मागील वर्ष हे चांगल्या पावसाचे, परंतु तेवढ्याच असमान वितरणाचे ठरले. आपल्या राज्यासह देशभरातील बहुतांश जलसाठे पावसाच्या पाण्याने बऱ्यापैकी भरले. परंतु जानेवारी २०१८ पासूनच राज्याला दुष्काळाची चाहूल लागण्यास सुरवात झाली. जलस्राेतांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. अनेक गावांतील पैसेवारीही ५० पैशापेक्षा कमी आली. फेब्रुवारी, मार्चपासून अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अशा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा चालू आहे. अशा वातावरणातच मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सामान्य तापमानात एक अंश सेल्शिअसपेक्षा अधिक वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमानवाढीने हा काळ सर्वाधिक उष्ण असल्याचे संकेतही मिळत आहेत. उष्ण लाटांनी शेती, ऊर्जा आणि मानवी आरोग्य या तिन्हींवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतील, असा इशाराही मिळाला आहे. संभाव्य तापमानवाढ ही ग्लोबल वॉर्मिंगचे लक्षण असल्याचेही काही तज्ज्ञ स्पष्ट करतात. खरे तर १७५० नंतरच्या औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीभोवतीच्या तापमानात वाढ होत आहे. १९०६ ते २००५ या १०० वर्षात जागतिक सरासरी तापमान ०.७४ सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले आहे. २० व्या शतकाच्या मध्यापासून झालेली जास्तीत जास्त तापमानवाढ ही मानवनिर्मित हरितगृह वायूच्या वाढीमुळे झाल्याचे आढळते. तापमानवाढीचा हा इतिहास पाहता याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल.

तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ‘जलयुक्त’ने साठलेले पाणी आटलेले तर दिसेलच, परंतु मोठी धरणेही कोरडी पडतील. जमीन (भूगर्भ साठे) आणि पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनात वाढ होईल. त्यामुळे या काळात शेतीत असलेली उन्हाळी पिके करपतील, फळबागा वाळतील. जनावरे-पशुपक्ष्यांना पाणी मिळणार नाही. टंचाईच्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांना दाही दिशा भटकंती करावी लागेल. दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे शासनालाही जिकिरीचे ठरेल. अत्यंत गंभीर बाब म्हणजे अतिउष्ण वर्षात कष्टकरी शेतकरी-शेतमजूर उष्माघाताचे बळी ठरतील. अशावेळी हवामान विभागाचा इशारा गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांसह इतरांनाही बसणारे चटके कमी करण्यावर शासनाला भर द्यावा लागेल.

तीव्र पाणीटंचाईच्या काळात हंगामी पिके, फळबागा कशा वाचवायच्या याचे व्यवस्थापन तंत्र शेतकऱ्यांना त्वरीत मिळायला हवे. जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचेही पुढील तीन-चार महिन्याचे नियोजन हवे. जनावरांच्या बाबतीत मागील दुष्काळातील अत्यंत वाईट अनुभव शेतकरी आणि शासनाच्या गाठीशी आहेत. तसे जनावरांचे हाल या उन्हाळ्यात होणार नाहीत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. दुष्काळी पट्ट्यातील सर्व गावांत आत्तापासूनच पाण्याची मोजदाद करून त्यांना जूनपर्यंत पिण्याचे पाणी कसे पुरेल अथवा कुठून उपलब्ध करता येईल, याचा विचार होऊन त्यावर त्वरीत काम सुरू करावे लागेल. गावच्या वॉटर बजेटचे हे काम गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सहभागातून शक्य तेवढ्या लवकर सुरु करायला हवे. जागतिक तापमानवाढीवर मात करायची असेल तर कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल. तसेच शक्य असेल तिथे वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करावी लागेल.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...