agrowon marathi article, vegetable crop and water management advice | Agrowon

भाजीपाला पीक सल्ला
डॉ. यु. एन. आळसे, डी. डी. पटाईत
शुक्रवार, 9 मार्च 2018

मिरची  

मिरची  

 •  गादीवाफ्यावरील रोपांची मुख्य शेतात लागवड करावी. लागवड ६०x६० किंवा ६०x४५ सें.मी. अंतरावर करावी.
 •  लागवडीपूर्वी हेक्‍टरी शेणखत २५ टन, नत्र ५० किलो, स्फुरद ८० किलो व पालाश ५० किलो अशी खतमात्रा द्यावी.  
 •  पिकास जमिनीच्या मगदूरानुसार ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
 • पुनर्लागवड केल्यानंतर रोपांवर रसशोषण करणाऱ्या मावा, फुलकीड आदी किडींचा प्रादुर्भाव होतो. रसशोषक किडी या लिफ कर्ल व्हायरसच्या वाहक असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाय करावेत. 

रसशाेषक कीड नियंत्रण 
 रोपप्रक्रिया ः प्रतिलिटर पाणी 
इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के) ०.३ मि.लि. 
सूचना:  रोपे वरील द्रावणात बुडवूनच लावावीत. 
फवारणी ­ः प्रति लिटर पाणी फिप्रोनिल (५ टक्के) २ मि.लि. 

भाजीपाला 

 • रताळी पिकाची काढणी व नवीन पिकाची लागवड याच महिन्यात करावी. 
 •  गवार, भेंडी, मेथी, अंबाडी, चुका, पालक, कोथिंबीर व वेलवर्गीय भाज्यांची लागवड करावी. 
 •  जानेवारी महिन्यात लावलेल्या काकडी वर्गीय भाजीपाला, गवार, भेंडी इत्यादी पिकांना नत्राचा दुसरा प्रतिहेक्टरी ५० किलो या प्रमाणात द्यावा. 
 •  कोथिंबीर लागवडीसाठी स्थानिक शिंपी, डी डब्ल्यु-३ किंवा सीएस-४ या जातींची निवड करावी. 
 •  वांगी पिकाच्या वैशाली किंवा प्रगती या सुधारित जातींची लागवड करावी. 
 •  काकडी लागवडीसाठी जॅपनीज लॉग या सुधारित जातींची निवड करावी. 
 •  कारली लागवडीसाठी पुसा नसदार या जातींची निवड करावी. शिरी दोडका पिकासाठी कोकण हरिता व फुले सुचेता या जातींची निवड करावी. 

 

   पाणी व्यवस्थापन

 • उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करावा. शक्‍यतो सिंचनासाठी ठिबकसिंचन, भूमिगत ठिबकसिंचन, तुषारसिंचन आदी पद्धतींचा अवलंब करावा. ठिबकसिंचन संच नसल्यास मडका सिंचनपद्धतीने पाणी द्यावे. तण नियंत्रण करावे.
 •   जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. 
 •   हलकी कोळपणी करून जमिनीत पडलेल्या भेगा बुजवाव्यात. पिकाला मातीची भर लावावी. 
 •   उष्ण वाऱ्यामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी शेताच्या सभोवताली सजीव कुंपणाची लागवड करावी. तसेच शेडनेट किंवा इतर कापडांचे कुंपण करावे. 
 •   नवीन फळझाडांना सावली करावी. झाडांचा आकार मर्यादित ठेवावा. अनावश्‍यक फांद्यांची छाटणी करावी. पाण्याचा ताण पडल्यास फळसंख्या कमी ठेवावी. फळबागांमध्ये खोडाभोवती मातीचा थर द्यावा.  
 •   पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी पिकांवर त्यांच्या अवस्थेनुसार पोटॅशियम नायट्रेट ०.५ ते १.५ टक्के (५ ते १५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. 
 •   खतांची मात्रा जमिनीत ओल असताना द्यावी. खते पिकांच्या मुळांच्या सानिध्यात द्यावी. ठिबक सिंचनाची सोय असल्यास खते ठिबक सिंचन संचातून द्यावीत. जमिनीत ओलावा नसल्यास किंवा सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यास उपलब्ध पाण्यातून विद्राव्य खतांची मात्रा ठिबकसिंचन संचातून द्यावी. तसेच फवारणीच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रण (ग्रेड - २ ) ची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मात्रा द्यावी. 

       ०२४५२-२२९०००    

      (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...