agrowon marathi special article on dairy development in Punjab state | Agrowon

सुधारित तंत्रातून पंजाबची दुग्ध व्यवसायात आघाडी
धरमिंदर भल्ला, डॉ. शांताराम गायकवाड
रविवार, 8 एप्रिल 2018

पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आग्रही आहेत. या पशुपालकांनी एकत्र येत १९७२ मध्ये पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली. गोठ्यात गाई, म्हशींच्या वेळच्या वेळी सर्व गरजा पूर्ण होतील याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे तेथील गाय प्रति वेत आठ ते दहा हजार लिटर दूध देत आहे. 
 

पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आग्रही आहेत. या पशुपालकांनी एकत्र येत १९७२ मध्ये पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली. गोठ्यात गाई, म्हशींच्या वेळच्या वेळी सर्व गरजा पूर्ण होतील याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे तेथील गाय प्रति वेत आठ ते दहा हजार लिटर दूध देत आहे. 
 

गेल्या काही वर्षांत देशामध्ये दुग्धव्यवसायाने चांगली गती घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढलाच, त्याचबरोबरीने शेतीला चांगले सेंद्रिय खत मिळू लागले. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात जरी अग्रेसर असलो तरी एका गाई, म्हशीच्या दुग्धोत्पादनाचा विचार केला तर आपण फारच मागे आहोत. त्याच बरोबर प्रतिमाणशी दूध उपलब्धतासुद्धा फार कमी आहे. आपणास या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर या व्यवसायाला एका कंपनीचे स्वरूप दिले पाहिजे. कमी खर्चात आपल्याकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान सर्वांच्यापर्यंत पोचविणे गरजेचे आहे.

पंजाबमधील दुग्ध व्यवसाय 

आपल्या देशातील दुग्ध व्यवसायातील व्यवसायिकतेचा विचार केला तर आपल्या पुढे पंजाब राज्य डोळ्यासमोर येते. या राज्यातील दुग्ध व्यवसाय हा उत्तम दर्जाचा असून तेथील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आग्रही आहेत. या ठिकाणी म्हशीपेक्षा गाईंचे संगोपन जास्त प्रमाणात केले जाते. या राज्यात देशी गोवंशाचा विचार केला तर साहिवाल जातीचे प्रमाण जास्त आहे आणि विदेशी जातीमध्ये होल्स्टिन फ्रिजीयन गाईंची संख्या जास्त आहे. 
पंजाबमधील पशुपालकांनी कमी दुधाच्या जास्त गाई सांभाळण्यापेक्षा अधिक दुधाच्या कमी गाईंच्या संगोपनावर भर दिला आहे. आपण म्हणतो की, विदेशी जनावराची शुद्धता ही प्रजनन करताना ६७.५ टक्के पर्यंतच मर्यादित ठेवली पाहिजे. जर ही शुद्धतेची मर्यादा वाढली तर गाईमध्ये आपल्या वातावरणात टिकण्याची क्षमता कमी होते, गाय जास्त आजारी पडते. परंतु, याबाबतीत पंजाबमधील पशुतज्ज्ञ आणि पशुपालकांनी होल्स्टिन गाईंमध्ये निवड पद्धतीने चांगले काम केले. ज्या गाई आपल्या वातावरणात टिकतील आणि चांगले दुग्धोत्पादन देतील अशा पंजाब होल्स्टिन फ्रिजीयन गाई गोठ्यात तयार केल्या. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे यांची होल्स्टिन गुणधर्माची शुद्धता १०० टक्के आहे, तसेच जास्त गुणवत्तापूर्ण दूध देण्याची चांगली क्षमता आहे.  

सुधारित व्यवस्थापनावर भर 

 •  पशुपालक दूध उत्पादनाच्या तुलनेने कमी पशुखाद्य आणि अधिक गुणवत्तेचा भरपूर हिरवा चारा गाईंना देतात. हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल प्रकारात मका आणि ओटचे प्रमाण अधिक असून द्विदल चाऱ्यामध्ये बरसिमचे प्रमाण अधिक असते. यातील एकदल चारा हा मुरघासाच्या माध्यमातून दिला जातो. बरसीम चारा आहे असाच दिला जातो. काही पिकांच्या उपपदार्थांचा वापर गाईंच्या आहारात करून आहारावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न असतो. उदा. बीट पल्पचा वापर, मुरघास बरोबरीने गव्हाच्या काडाचा वापर आहारात प्रामुख्याने केला जातो. 
 •  आपल्याकडे गव्हाच्या काडाला विशेष महत्त्व दिले जात नाही. बहुतांशी शेतकरी ते गोळा करू जनावराच्या आहारात वापरण्याएेवजी रानातच पेटवून देतात. त्यामुळे हिरव्या चाऱ्याच्या पचनास आवश्यक असणारा सुका चारा न मिळल्याने आपण नुकसानच करून घेतो आणि गव्हाचे काड जाळून हवेचे प्रदूषण सुद्धा वाढवतो. परंतु, पंजाबमधील पशुपालक मुरघास बरोबरीने गव्हाच्या काडाचा वापर करतात.
 • गाई, म्हशींना दिवसातून दोन वेळा आहार दिला जातो. त्यामध्ये चाऱ्याचे प्रमाण भरपूर असते. दुसऱ्या वेळी आपण ज्या वेळी चारा गाईंना द्यायला जातो, त्या वेळी थोडा अगोदरचा चारा शिल्लक असलाच पाहिजे. गाईंच्या आहारात टोटल मिक्स राशन या संकल्पनेचा वापर केला जातो. यामुळे प्रत्येक गाईला संतुलीत पोषक आहार मिळतो. गाईंना दूध देण्याच्या क्षमतेप्रमाणे संपूर्ण खाद्य मिश्रण असलेला संतुलीत आहार दिला जातो. गाईंना २४ तास पाणी मिळेल याची काळजी घेतली जाते. 
 • गोठा व्यवस्थापनात कमीतकमी मजुरांच्या वापरावर भर आहे. गाईंना अधिक आराम देण्याचा प्रयत्न केला जातो.  बदलत्या वातावरणाचा अधिक ताण गाईंना येणार नाही याची दक्षता घेतली जाते. या ठिकाणी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. गोठ्यात जनावरांना वेळच्या वेळी सर्व गरजा पूर्ण होतील याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे तेथील गाय प्रति वेत आठ ते दहा हजार लिटर दूध देते. 

 

पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन

 •  पंजाबमधील पशुपालक हा आधुनिक तंत्रज्ञानासाठी आग्रही आहे. राज्य शासन किंवा दूध सहकारी संघ तसेच खासगी दूध संकलन कंपनीवर अवलंबून न राहता येथील पशुपालकांनी एकत्र येत १९७२ मध्ये कॅप्टन कमलजीतसिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली.
 •  सन २००४ मध्ये सरदार दलजित सिंह सरदारपुरा यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आजही ते या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी संस्थेला जागतिक पातळीवर नेले आहे. पंजाबमधील सर्व पशुपालक दुग्ध व्यवसायात चांगले काम करण्यासाठी एकत्र आले असून आपला विकास आपण स्वतःच करू शकतो यादृष्टीने ही संस्था कार्यरत आहे. 
 •  संस्थेचा प्रत्येक सभासद ठराविक वर्गणी जमा करून विकास कामासाठी निधी जमवितात. जो पशुपालक दूध व्यवसायात अग्रेसर आहे,त्याला या संस्थेचे अध्यक्ष बनविले  जाते. 
 •  संस्थेतर्फे दर महिन्याला देश, विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानात पुढे असणारे पशुपालक तसेच पशुतज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.  
 •  संस्थेने यंत्रसामग्री उत्पादक, पशू उपचार औषधनिर्मिती कंपन्या, खाद्य उत्पादक कंपन्या, चांगल्या गुणवत्तेच्या रेतमात्रा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर करार केला आहे. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून पशुपालकांना ही उत्पादने कमी दरात उपलब्ध करून दिली जातात. यासाठी संस्थेने पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी सोल्यूशन ही व्यवसायिक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून सदस्यांना सुधारित पशू व्यवस्थापन तंत्र, आहार व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण चारा निर्मिती, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, मुरघास तंत्र, पुरक पशूआहाराबाबत वेळोवेळी माहिती दिली जाते. 
 •  संस्थेने पशु प्रजननामध्ये निवड पद्धतीने अधिक लक्ष देत अधिक दूध उत्पादन देणाऱ्या आणि आपल्या वातावरणात टिकणाऱ्या होल्स्टिन फ्रिजीयन गाई गोठ्यातच तयार केल्या आहेत. या जातीचा प्रसार सर्व पशुपालकांच्या पर्यंत होण्यासाठी रेतमात्रांचा पुरवठाही केला जातो.  
 •  संस्थेतर्फे दरवर्षी जग्राव (जि. लुधियाना) येथे डिसेंबर महिन्यात आंतराष्ट्रीय प्रदर्शन भरवले जाते. यामध्ये देश विदेशातील कंपन्यांचा सहभाग असतो. या वेळी पशु-पक्षी प्रदर्शन आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.

डॉ. शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९  

( गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. फलटण, जि. सातारा)

 

 

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...