agrowon marathi special article on eklahare village (dist. Nashik) sarpanch Mohini Jadhav. | Agrowon

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र,  नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...

नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र,  नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी...

एकलहरे ग्रामपंचायतीस दर वर्षी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम १२५ नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम १२५ रद्द करून कलम १२४ नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावून तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवण्याचे अतिरिक्त साधन नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले.
प्रशासकीय खर्च, छोट्या-छोट्या विकासकामांची बिल देयके रखडल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. त्यात दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो,  त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वत:च्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेतला.  या निर्णयाबाबत त्यांनी  सासरे दिलीप जाधव आणि पती संदीप जाधव यांना सांगितले. त्यांनी आनंदाने या निर्णयास संमती देत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आनंद हीच आपली दिवाळी असल्याचे सांगितले. सौ. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेकडे गहाण ठेवत एक लाख ७५ हजार रुपये जमवले. त्याचा धनादेश ग्रामसेवक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे सुपूर्त करीत त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याचे सूचित केले.

ग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु तो आजतागायत मिळालेला नाही. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा संबंधित प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला.
- मोहिनी जाधव, सरपंच

इतर ग्रामविकास
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
एकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम...लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
पाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
कृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...
सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...
माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...
प्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...
पेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...
राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...
दुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...
पायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...