agrowon marathi special article on genome editing part 2 | Agrowon

जनुकीय संपादित वाण सुरक्षित आणि शाश्वतही
GUNVAT PATIL
गुरुवार, 1 मार्च 2018

जनुकीय संपादन म्हणजे काय आणि ते कसे काम करते, हे पूर्वार्धात आपण पाहिले. या भागात शेतीक्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरणारे आहे, हे तर पाहूयातच; परंतु त्याचबरोबर जीएमओपेक्षा हे तंत्र कसे भिन्न आहे, तेही पाहूया...

जनुकीय संपादन या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे सजीवातील अनेक असाध्य रोगावर मात केली जाऊ शकते, यात संशोधकांच्या मनात काही शंका नाहीत. त्यामुळेच जनुकीय संपादनप्रक्रियेवर जगभरात विविध क्षेत्रांत खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान कृषिक्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. 

आरोग्यदायी आणि टिकाऊ 
वाण होतील विकसित

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये ‘हाय ओलिक अॅसिड’ सोयाबीनची वाण विकसित करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. ओलिक अॅसिड (मोनोअनश्याचूरेटेड ओमेगा ९ फॅट) हे खाद्य तेलात आढळणारा एक महत्त्वाचा घटक असतो, जो हृदयासाठी उपयुक्त मानला जातो. साधारणपणे सोयाबीनमध्ये याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असते; परंतु जीनोम एडिटिंगच्या आधारे याचे प्रमाण ८२ ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात कृषी संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे सोयाबीन तेलामध्ये ट्रान्स फॅट नसतील (शून्य ट्रान्स फॅट) आणि हे खाद्यतेल हृदयासाठी अतिशय फायदेशीर असेल. 
अशाच प्रकारे जनुकीय संपादनप्रक्रियेचा वापर करून मशरूममध्येसुद्धा अवश्य असा बदल घडवून आणला गेला आहे. मशरूम हे स्वास्थवर्धक आणि औषधीय खाद्यपदार्थ आहे आणि याचा मोठ्या प्रमाणात विषेशतः शाकाहारी जेवणात उपयोग केला जातो. परंतु मशरूममध्ये एक ‘पॉलीफेनोल ऑक्सिडेज’ नावाचे रसायन असते. ज्यामुळे मशरूम कापल्यानंतर ते काळे पडतात आणि त्यांची चवसुद्धा बदलते. परंतु नुकतेच हे रसायन उत्पन्न करणारे सहा जनुके शोधून जीनोम एडिटिंगद्वारे ते निकासित केले गेले आहेत. ज्याचा वापर करून मशरूमची एक नवीन वाण पेंन स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे तयार करण्यात आली आहे. मशरूमचे हे विकसित वाण कापणी केल्यानंतरही आपला पांढराशुभ्र रंग टिकवून ठेवते. लवकरच या जातीच्या मशरूमची शेती/उद्योग करणाऱ्यासाठी उपलब्ध करण्यात येईल व ग्राहकांना याचा आस्वाद घेता येईल. अशाप्रकारे जवळपास सर्व पिकांमध्ये या प्रकारचे विविध प्रयोग सुरू केले गेले आहेत. ज्यामुळे त्या पिकाचे उत्पन्नच नव्हे, तर रोगप्रतिकार शक्ती, दुष्काळ प्रतिरोधक, पोषकततत्त्वे, टिकाऊपण, रंग, आकार इ. गुणधर्म बदलविले जाणार आहेत. 

जीएमओपेक्षा हे तंत्र आहे भिन्न 
या लेखाद्वारे मला असेही सांगण्यास आनंद होतो की हे तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम आहे. हे सांगण्यामागचे कारण असे की प्रयोगशाळेत ‘जीएमओ’ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गनिझम्स) तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पिकाची वाण, म्हणजेच जनुकीय बदल केलेले जीव याबद्दल कृषी संशोधक, सरकार, शेतकरी आणि जनतेमध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहेत. तसेच, जीएमओ वाणांना नैतिक दृष्टिकोनातून विरोध होतो; कारण या तंत्रज्ञानात एका सजीवामधील जनुके काढून तो दुसऱ्या सजीवात टाकला जातो आणि त्यामुळे जीएमओच्या समर्थनार्थ अथवा विरोधी असे मतभेद दिसून येतात. परंतु हे मतभेद ‘जीनोम एडिटिंग’च्या बाबतीत उद्भवणार नाहीत. कारण या तंत्रज्ञानामध्ये जरी पिकाची नवीन वाण प्रयोगशाळेत तयार केली गेली, तरी या प्रक्रियेत दुसऱ्या सजीवामधून जनुके सोडली जात नाही. उलट ज्या सजीवामध्ये बदल घडवून आणायचा आहे, त्याच सजीवामध्ये अचूक ‘आंतरिक जनुकीय बदल’ केला जातो. तसेच, जनुकीय संपादन हे तंत्रज्ञान जीएमओप्रमाणे नियंत्रित केले जाणार किंवा जीएमओ म्हणूनही ग्राह्य धरले जाणार नाही.
 
जनुकीय संपादनास 
जगभरातून मिळतेय समर्थन

नुकत्याच आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीवरून असे कळते,  की अमेरिका, युरोप, चीन या देशांतील उच्चतरीय कृषी संस्थांनी जनुकीय संपादन या तंत्रज्ञानाला समर्थन दिले आहे. ज्याप्रमाणे नैसर्गिकरीत्या नवीन वाण तयार केली जातात, त्याचप्रमाणे  जनुकीय संपादनप्रक्रियेने तयार केलेली वाणसुद्धा नैसर्गिक, सुरक्षित व शाश्वत मानली जातील. यामुळे आपणास लवकरच जनुकीय संपादनप्रक्रियेने विकसित केलेली फळे, भाज्या आणि धान्य बाजारात दिसतील व त्याचा आस्वाद घेता येईल. विशेषतः याचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा होईल. ज्या गतीने जनुकीय संपादनावर संशोधन चालू आहे त्यावरून असे वाटते, की हे तंत्रज्ञान नक्कीच दुसऱ्या हरितक्रांतीमध्ये मोलाचा वाटा उचलेल, यात शंका नाही.

GUNVAT PATIL

 gpatil@umn.edu
(लेखक युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा, सेंट पॉल, (युएसए) येथे संशोधक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...