agrowon marathi special article on monsoon rain | Agrowon

मॉन्सून वेळआधी महाराष्ट्रात दाखल होणार
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 2 जून 2018

महाराष्ट्रावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल राहील. काश्‍मीर, राजस्थानवर ९९८ ते १००२ हेप्टापास्कल तर मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दिनांक ४ जून रोजी महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब असेल. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेचा दाब आणखी कमी होईल. दिनांक ६ जून रोजी कोकणावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तर गुजरातवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वारे वेगाने उत्तर दिशेने वाहतील. बंगालच्या उपसागरावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्या दिशेने ढग प्रवेश करतील.

महाराष्ट्रावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल राहील. काश्‍मीर, राजस्थानवर ९९८ ते १००२ हेप्टापास्कल तर मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दिनांक ४ जून रोजी महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब असेल. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेचा दाब आणखी कमी होईल. दिनांक ६ जून रोजी कोकणावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तर गुजरातवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वारे वेगाने उत्तर दिशेने वाहतील. बंगालच्या उपसागरावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्या दिशेने ढग प्रवेश करतील. दिनांक ७ जून रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुन्हा कमी होतील. तेव्हा राजस्थान व काश्‍मीरवर ९९६ ते ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. ही स्थिती मॉन्सून वेगाने उत्तेरकडे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल बनत आहे. दिनांक ५ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल. दिनांक ७ जूनपर्यंत तो महाराष्ट्र व्यापेल. दिनांक १० जूनपर्यंत मराठवाडा व विदर्भाचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापलेला असेल. दि. ११ जूनपर्यंत काश्‍मीरपर्यंत पोचेल. महाराष्ट्रात २० जूनपर्यंत चांगला पाऊस होईल. कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रात १५ जूननंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. 

  कोकण 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल ताममान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ७६ ते ७७ टक्‍के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८१ ते ८७ टक्के राहील. दुपारीच सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ७१ ते ७३ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६६ ते ६८ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७ ते ९ जूनला चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.

  उत्तर महाराष्ट्र 
उत्तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, नाशिक जिल्ह्यात १०मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ८ मिलिमीटर, नंदुरबार जिल्ह्यात २२ मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात २९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ४१ सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात मात्र कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात ७८ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ६५ ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३४ टक्के राहील.

  मराठवाडा 
लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ५० ते ५६ मिलिमीटर तर बीड जिल्ह्यात ३३ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांत १२ ते २२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.  उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, औरंगाबाद, परभणी व जालना जिल्ह्यात किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. बीड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व हिंगोली जिल्ह्यांत ३५ टक्के राहील. परभणी जिल्ह्यात ४८ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यांत ६२ ते ७९ टक्के राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४६ टक्के व जालना जिल्ह्यात ३७ टक्के राहील.

  पश्‍चिम विदर्भ 
अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर बुलडाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ रहीाल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के तर दुपारची आर्द्रता ३२ ते ३९ टक्के राहील. पावसाचे प्रमाण २ ते १० मिलिमीटर राहील.

 मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील, वर्धा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६५ टक्के तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ५९ टक्के राहील. किमान तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअस राहील. 

पूर्व विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात १० मिलिमीटर, भंडारा जिल्ह्यात ५ मिलिमीटर तर भंडारा जिल्ह्यात २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस,चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३५ टक्के राहील.

  दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र 
पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता असून, पुढे वाढ होत जाईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअर राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ८१ ते ८४ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६३ टक्के राहील तर उर्वरित नगर जिल्ह्यात ३७ टक्के व सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के इतकी राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...