agrowon marathi special article on NCDEX and MCX Market rates | Agrowon

सोयाबीन, मका, हरभऱ्यात नरमाई; साखर, हळद, कापसाचा चढता कल
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 1 जून 2018

एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता सर्वच पिकांच्या भावात घसरण झाली. या सप्ताहात सर्वांत अधिक घसरण सोयाबीनमध्ये
 (४.५ टक्के), तर सर्वांत अधिक वाढ कापसात (६.१ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात सोयाबीन, हळद यांच्यात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.  

केरळमध्ये आता माॅन्सूनचे आगमन झाले असून, त्याची प्रगती सध्या समाधानकारक आहे. कापसाखेरीज इतर सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल, असा अंदाज केला जात आहे.  गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे ः

एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता सर्वच पिकांच्या भावात घसरण झाली. या सप्ताहात सर्वांत अधिक घसरण सोयाबीनमध्ये
 (४.५ टक्के), तर सर्वांत अधिक वाढ कापसात (६.१ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात सोयाबीन, हळद यांच्यात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.  

केरळमध्ये आता माॅन्सूनचे आगमन झाले असून, त्याची प्रगती सध्या समाधानकारक आहे. कापसाखेरीज इतर सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल, असा अंदाज केला जात आहे.  गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे ः

मका
रब्बी मक्याच्या (जून २०१८) किंमती २० एप्रिलपर्यंत रु. १२३१ पर्यंत वाढल्या होत्या. नंतर त्या घसरू लागल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,२०१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१५० वर आल्या  आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२२४ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५  आहे. उत्पादन वाढलेले असले, तरी मागणीसुद्धा वाढत आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतीत घट संभवते. 

साखर 
साखरेच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत्या होत्या. मे महिन्यात त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,७८२ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किंमती रु. २,७७० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. २,७९८ वर आल्या आहेत. गळिताचा हंगाम आता संपला आहे.  पुढील काही दिवसात वाढ अपेक्षित आहे.  

हळद  
हळदीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिलमध्ये वाढत होत्या. मे महिन्यात त्या वाढत्या आवकेमुळे घसरू लागल्या होत्या. गेल्या सप्ताहात १.४ टक्क्यांनी घसरून त्यांनी  रु. ७,२८० ची पातळी गाठली होती. या सप्ताहातसुद्धा त्या १.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,१५४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४०० वर  आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.२ टक्क्यांनी (रु. ७,३१२) कमी आहेत. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणी सुद्धा वाढती आहे. आवक आता कमी होईल. लांबवरच्या  किमतीत वाढ अपेक्षित आहे.   

गहू 
गव्हाच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात रु. १,७११ ते रु. १,७७३ दरम्यान होत्या.  या सप्ताहात त्या -०.५ टक्क्यांनी घसरून रु. १,८१५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा)  रु. १,७९० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.५ टक्क्यांनी (रु. १,८५३) अधिक आहेत. पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. 

हरभरा
एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१८) किंमती घसरत होत्या. गेल्या सप्ताहात  त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,६२६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,५८६ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किंमती रु. ३,६०० वर आल्या आहेत. ऑगस्ट  २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.६ टक्क्यांनी (रु. ३,६५६) अधिक आहेत. शासनाचा हमी भाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे.  एप्रिलनंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयातशुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. मात्र त्यांचा परिणाम मर्यादित राहील. 

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती २० एप्रिलपासून घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,८२८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७१७ वर आल्या आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती २.५ टक्क्यांनी घसरून   रु. ३,७५४ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती ०.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७६७). जून महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे.   

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. मे महिन्यात सुद्धा तोच कल कायम राहिला. या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,६२० पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७०४ वर आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,६४९ वर आल्या आहेत.  जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमतीचा कल नरम राहील. 

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती १६ एप्रिलपर्यंत वाढत होत्या (रु. २१,४८०). नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ६.१ टक्क्यांनी वाढून रु. २२,३६०  वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु.२१,०३५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.७ टक्क्यांनी (रु. २२,६५०) अधिक आहेत. कापसाची निर्यात वाढती आहे. अमेरिका व चीनमध्ये प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. किमतींत वाढ होण्याचा संभव आहे. 
(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).

 - arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...