मत्स्यसंवर्धन नवीन तळ्यांची निर्मिती

मत्स्यसंवर्धन तलाव
मत्स्यसंवर्धन तलाव

केंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत ‘मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन’ या योजनेत २१ विविध योजना राबविल्या जातात. या धोरणांतर्गत मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेती करणारे, मत्स्योद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे. मत्स्योत्पादनवाढीच्या योजना राबविताना शाश्वत पद्धतीने, जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

  • राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांमुळे भूजल मत्स्योत्पादनात भरीव वाढ.
  •  २०१५-१६ मध्ये असलेल्या १.४४ लाख टन वरून ते सन २०१६-१७ मध्ये २ लाख टनांपर्यंत.
  •  गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशात दहाव्या क्रमांक.
  • अशी आहे योजना  भूजलाशयीन मत्स्योत्पादन वाढीला मोठा वाव आहे. भूजलाशयीन मत्स्योत्पादनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी नीलक्रांतीअंतर्गत भूजलाशयीन क्षेत्रासाठीच्या आठ योजनांतर्गत ‘ मत्स्यसंवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे’ या एका योजनेचा समावेश आहे. 

    योजनेचे उद्दिष्ट 

  • भू-जलाशयीन क्षेत्रात पाण्याचे स्रोत असलेल्या व सुयोग्य ठिकाणी मत्स्यतळ्याची निर्मिती करून मत्स्यबीजाचे साठवणूक करून मत्स्यसंवर्धनाद्वारे मत्स्योत्पादनात वाढ व मत्स्यशेती करणाऱ्यांची आर्थिक उन्नती.
  • योजनेचे निकष, अटी व शर्ती 

  • लाभार्थीची स्वत:ची जागा असणे आवश्यक. ना-हरकत प्रमाणपत्राची जबाबदारी लाभार्थींची असते.
  • बांधकाम केल्यानंतर पाण्याची पातळी १.५ मीटर असणे आवश्यक आहे.
  • केंद्राच्या अर्थसहाय्याची मर्यादा सर्वसाधारण लाभार्थ्यास २ हेक्टरपर्यंत आणि सहकारी संस्थांसाठी २० हेक्टरपर्यंत असेल.
  • केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या शिखर संस्था, महामंडळ व संस्था यांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्थसाह्याचे स्वरूप   केंद्र शासनाचा ५० टक्के व लाभार्थ्याचा ५० टक्के हिस्सा.  नवीन तळी बांधकामासह त्यामध्ये पाण्याची पातळीचे नियंत्रण करणारी यंत्रणा, पाणी पुरवठ्याच्या सोयी व एरिएशन यंत्रणा, खाद्य ठेवण्याचे गोदाम आदींसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांच्या मर्यादेत केंद्र शासनाचे ५० टक्के म्हणजेच ३ लाख ५० हजार रुपये अनुदान.

    संपर्क कार्यालयाचे नाव आणि पत्ता 

  • विभागस्तरीय कार्यालयाचे प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय.
  • जिल्हा स्तरावर संपर्क ः  संबंधित जिल्हा कार्यालयाचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय. वर्सोवा (मुंबई), वसई, सातपाडी, बडापोखरण आणि दापचरी (ठाणे), अलिबाग (रायगड), रत्नागिरी आणि मिरकरवाडा (रत्नागिरी), मालवण (सिंधुदुर्ग), मोर्शी (अमरावती), इसापूर (अमरावती) आणि ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अशी बारा उप कार्यालये आहेत. 
  • योजनांच्या लाभासाठी उप कार्यालय स्तरावर संपर्क ः मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.
  • राज्यस्तरावर संपर्क ः मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष रोड, चर्नीरोड, मुंबई- ४००००२, दूरध्वनी क्र. ०२२-२२८२१२३९ फॅक्स - ०२२-२२८२२३१२ इ-मेल comm_fisheries@maharashtra.gov.in
  •   - सचिन गाढवे, ९४०३३५६९५६ (सहायक संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com