मराठवाडा, विदर्भात तापमानवाढीचे संकेत

मराठवाडा, विदर्भात तापमानवाढीचे संकेत
मराठवाडा, विदर्भात तापमानवाढीचे संकेत

महाराष्ट्राच्या मध्यावर दक्षिण उत्तर  दिशेने १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मार्च महिनाअखेरीस संपूर्ण पूर्व महाराष्ट्रावर हवेचे दाब अत्यंत कमी म्हणजे १००४ हेप्टापास्कल इतके कमी होत असल्याने विदर्भ, मराठवाड्यात तसेच दक्षिण पूर्व महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होऊन उष्मा जाणवेल. पाण्याचे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. पूर्व भारतात ही तापमानात वेगाने वाढ होऊन प्रखर उन्हाळा जाणवण्यास सुरवात होईल.   दिनांक ३ व ४ एप्रिल मंगळवार व बुधवार रोजी दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. सातत्याने होणारी तापमानातील वाढ उन्हाची तीव्रता यापुढे वाढतच राहील. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण घटत जाईल. दुपारी अत्यंत कोरडे हवामान राहील. सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढतच जाईल आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढत जाईल. कोकण  ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात ७२ ते ७९ टक्के राहील तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ८१ ते ८३ टक्के इतकी राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के इतकी कमी राहील व हवामान अत्यंत कोरडे राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५६ टक्के राहील. 

उत्तर महाराष्ट्र   जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ टक्के इतकी कमी राहील व हवामान कोरडे राहील. धुळे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३९ टक्के इतकी कमी राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४५ टक्के राहील. नंदूरबार जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ६ टक्के इतकी कमी राहण्यामुळे दुपारी उष्ण हवा जाणवेल. त्याचप्रमाणे नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १४ टक्के राहील .

मराठवाडा  परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर नांदेड जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच जालना जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नांदेड व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. नांदेड व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३७ टक्के राहील. लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के इतकी कमी राहील. उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ २४ ते २८ टक्के राहील. त्यामुळे सकाळी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १६ टक्के इतकी कमी राहण्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ  वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा व अकोला जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. तर अकोला व वाशिम जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ १८ ते २० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १२ टक्के राहील. 

मध्य विदर्भ  मध्य विदर्भात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. 

पूर्व विदर्भ  गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ १६ टक्के इतकी कमी राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ८ ते १० टक्के इतकी कमी राहील. 

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र  सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व अहमदनगर जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील आणि पुणे जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ३७ टक्के, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ४४ ते ४५ टक्के, सांगली जिल्ह्यात ६० टक्के आणि सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ७० ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ९ ते १० टक्के राहील, सातारा जिल्ह्यात ती ११ टक्के राहील. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत १६ ते १७ टक्के राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यात १९ टक्के राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com