agrowon marathi special news Aaple sarkar seva kendra in Parbhani dist. | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र`
माणिक रासवे
गुरुवार, 14 जून 2018

परभणी (प्रतिनिधी)ः ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीगृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम साॅफ्टवेअर देण्यात आले आहे.

परभणी (प्रतिनिधी)ः ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीगृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम साॅफ्टवेअर देण्यात आले आहे.

आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून केंद्र शासनाचा ई -पंचायत प्रकल्प (११ एनआयसी आज्ञावली) ग्रामपंचायत लेखसंहिता २०११ चे १ ते ३३ रजिस्टर डिजिटाइज्ड; तसेच आॅनलाइन करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींद्वारे देण्यात येणारे जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र ,मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, स्वच्छतागृह दाखला, बांधकाम परवाना, नादेय प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, हयातीचा दाखला, जाॅब कार्ड आदी सेवा आॅनलाइन करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकोपयोगी असलेल्या रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, आर्थिक समावेशन, ई-काॅमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, पासपोर्ट, वीजबिल भरणे आदी सेवादेखील आपले सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ६९ ग्रामपंचायतींमध्ये तसेच १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या २०४ ग्रामपंचायतींमध्ये (स्वच्छेने) स्वंतत्र आपले सेवा सरकार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. १५ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या ४३१ ग्रामपंचायतींचे क्लस्टर तयार करून १८९ आपले सेवा सरकार सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली.

खर्च आणि वेळेची बचत
आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्थांना गावातच माफक शुल्कात ग्रामपंचायतींकडून संगणकीकृत दाखले देण्यात येत आहेत. तसेच अन्य आॅनलाइन सुविधादेखील मिळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा खर्च आणि वेळेची बचत होत आहे.
- विजय मुळीक
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),
जिल्हा परिषद,परभणी

‘आपले सेवा सरकार केंद्र` उभारणी स्थिती ः
 

तालुका ग्रामपंचायत संख्या आपले सरकार सेवा केंद्र
परभणी ११७ ६४
जिंतूर १३ ९७
सेलू ८२ ४७
मानवत ४९ ३७
पाथरी ४९ ३८
सोनपेठ ४२ २६
गंगाखेड ८४ ७०
पालम ६६ ४०

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...