agrowon marathi special news on Grampanchyat working | Agrowon

ग्रामपंचायत स्तरावरील कामे मुदतीत पूर्ण होण्याची हमी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 मे 2018

 ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्याची हमी देण्याची अधिसूचना पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र दिनापासून लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सर्वोत्तम सेवा मिळणार असून, कार्यालयांमध्ये विनाकारण होणारी अडवणूक, वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी अस्थापना विभागात ‘सेवा हक्क हमी’ कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

 ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्याची हमी देण्याची अधिसूचना पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र दिनापासून लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सर्वोत्तम सेवा मिळणार असून, कार्यालयांमध्ये विनाकारण होणारी अडवणूक, वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी अस्थापना विभागात ‘सेवा हक्क हमी’ कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

पुणे जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांची कामे सहजासहजी व्हावीत, यासाठी प्रत्येक विभागात आलेल्या फाईल, प्रस्ताव, अर्जांवर मंजूर आणि नामंजूर यापैकी एकच शेरा मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर विनाकारण अनेक दिवस कामे प्रलंबित राहत असल्याने एखादी सेवा देण्यासाठी लागणारा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास विलंबाची जबाबदारी निश्‍चित करून, संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिदिनी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये ‘सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’ची स्थापना करणार येणार आहे. 

कर्मचाऱ्यांची स्वतःची कामे प्रलंबित ठेवून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रलंबित विषयदेखील मुदतीतच मार्गी लागतील यादृष्टीने आस्थापना विभागातदेखील सेवा हक्क हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून अधिक प्रलंबित असलेल्या सेवा मुदतीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली अाहे. यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकांसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर प्रत्येकी १५ दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्तीच्या एक दिवस अगोदर सेवानिवृत्ती वेतन, नंतरच्या सर्व लाभांचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. 

ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरांवर हमी मिळणाऱ्या सेवा

               सेवा                          : कार्यवाहीचा कालावधी

 •     ग्रामपंचायत विभाजन : १५ दिवस
 •     गायरान जमीन मागणी : १५ दिवस
 •     स्ट्रीट लाईट प्रस्ताव : १० दिवस
 •     बांधकाम मंजुरी : लगतची मासिक सभा/३० दिवस
 •     नमुना नं ८ ला नोंद करणे : लगतची मासिक सभा/३० दिवस
 •     ना हरकत प्रमाणपत्र : लगतची मासिक सभा/३० दिवस
 •     वैद्यकीय देयके : १० दिवस
 •     कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादी : २ महिने
 •     ग्रामपंचायत कर्मचारी अपिले : १५ दिवस
 •     तक्रार अर्ज : १५ दिवस
 •     ऑनलाईन तक्रार : २१ दिवस

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...