agrowon marathi special news regarding e-gramsoft system | Agrowon

ग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 मार्च 2018

ग्रामपंचायती होणार पेपरलेस 
ग्रामपंचायतींचा कारभार जलद व सुरळीत व्हावा, यासाठी ऑनलाइन कामकाजावर शासनाचा भर आहे. त्यानुसार ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली ग्रामपंचायतींना दिली जाणार असून, ग्रामपंचायती पेपरलेस होतील. 
- संजय मस्कर, 
अतिरिक्त सीईओ, जळगाव जिल्हा परिषद

जिल्हाभरातील १,१५१ ग्रामपंचायतींमध्ये पुढचा कारभार आता संगणकावर चालणार असून, त्या संदर्भात ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. हे कामकाज १ मेपासून ऑनलाइन असणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने म्हटले  आहे. 

     ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी  ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली विकसित केली आहे. येत्या १ एप्रिलपासून ग्रामपंचायतींचे दफ्तर संगणकीकृत करण्याचे काम वेगाने सुरू होईल. आर्थिक व्यवहारांच्या नोंदी व इतर नोंदणी, आवक जावक याच्या नोंदी ऑनलाइनच असतील. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना दिले जाणारे १ ते ३३ नमुने संगणकाद्वारे मिळतील. हे नमुने किंवा दाखले ग्राह्य धरले जातील. हस्तलिखित दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. ग्रामपंचायतीचे जे दफ्तर उपलब्ध आहे, ते पूर्ण ऑनलाइन करावे लागेल. हे कामकाज १ मेपर्यंत पूर्ण करायचे आहे. दफ्तर पूर्णतः ऑनलाइन झाल्यानंतर दफ्तरची तपासणी करून ते सील केले जाईल. ग्रामपंचायतीमध्येच ते एका कपाटात ठेवले जाईल. पदाधिकारी व सदस्य यांच्या समक्ष त्यासंबंधीची कार्यवाही होईल. 

  ई - ग्रामसॉफ्ट प्रणालीचा फायदा 
 मालमत्ता करआकारणी, रहिवासी, वीजजोडणीसाठी ना हरकत, ना हरकत देय प्रमाणपत्र, शौचालय उपलब्धता, बांधकाम अनुमती, जन्म व मृत्यू नोंद, शासकीय योजनांचा लाभ, विवाह नोंदणी, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, नोकरी व व्यवसायासाठी ना हरकत, वय, कुटुंब प्रमाणपत्र, वर्तणूक, नळजोडणी अनुमती, बेरोजगार प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार आदी दाखले या प्रणालीतून मिळतील. यासाठी वीस रुपये शुल्क ग्रामस्थाला नियमानुसार द्यावे लागणार आहे. हे दाखले तातडीने दिले जावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...