agrowon marathi special news regarding plough and spray pump in jalgaon dist. | Agrowon

पलटी नांगर, फवारणी पंप योजनेला चांगला प्रतिसाद
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव : थेट अनुदान (डीबीटी) पद्धत लागू असतानाही जिल्हा परिषदेच्या स्वनिधीअंतर्गत राबविलेल्या व्यक्तीगत लाभाच्या कृषी योजनेतील पलटी नांगर व बॅटरीचलित फवारणी पंप योजनेला प्रतिसाद लाभला. या योजनांचा लक्ष्यांक १०० टक्के पूर्ण झाला. शिवाय अनेक जणांचा समावेश प्रतीक्षा यादीत करावा लागला. मात्र इतर कृषी योजनांना डीबीटीमुळे कमी प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

जळगाव : थेट अनुदान (डीबीटी) पद्धत लागू असतानाही जिल्हा परिषदेच्या स्वनिधीअंतर्गत राबविलेल्या व्यक्तीगत लाभाच्या कृषी योजनेतील पलटी नांगर व बॅटरीचलित फवारणी पंप योजनेला प्रतिसाद लाभला. या योजनांचा लक्ष्यांक १०० टक्के पूर्ण झाला. शिवाय अनेक जणांचा समावेश प्रतीक्षा यादीत करावा लागला. मात्र इतर कृषी योजनांना डीबीटीमुळे कमी प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेने मागील वित्तीय वर्षात (२०१७-१८) स्वनिधीतून एक कोटी रुपये तरतूद केली होती. हा निधी एचडीपीई पाईप, फवारणीचे हातपंप, पलटी नांगर, बॅटरीचलित फवारणी पंप, ताडपत्री यासंबंधी खर्च करायचा होता. ज्या योजनेला अधिक प्रतिसाद त्यावर खर्च करायचा होता. यातील फक्त बॅटरीचलित फवारणीचे पंप, पलटी नांगर योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु एचडीपीई पाईप, हातपंप व ताडपत्रीसंबंधीच्या अनुदानासाठी प्रस्ताव आले नाहीत. फक्त २०० शेतकऱ्यांनी ताडपत्री, हातपंप व एचडीपीई पाईपसंबंधी अनुदानासाठी प्रस्ताव दिले. तब्बल ४८ लाख निधी अखर्चित राहीला. हा अखर्चित निधी पलटी नांगर व बॅटरीचे फवारणी पंप यावर खर्च करण्याचा निर्णय कृषी समितीने घेतला. यामुळे सुमारे २०० पेक्षा अधिक पलटी नांगरचे प्रस्ताव व सुमारे २२० शेतकऱ्यांचे बॅटरी पंपचे प्रस्ताव मार्गी लागले.

डीबीटीमुळे निधी गुंतविणे टाळले
डीबीटीअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरवातीला संबंधीत अवजारांची खरेदी पूर्ण पैसे भरून शेतकऱ्याला करावी लागले. निर्देशीत कंपन्यांनी तयार केलेल्या कंपनीचे अवजार घ्यायचे असते. खरेदीपूर्वी पूर्वसंमती घ्यावी लागते. खरेदीनंतर त्यावर ५० टक्के अनुदान दिले जाते. अर्थातच पलटी नांगर व बॅटरीचे पंप शेतीसाठी अधिक उपयोगाचे असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीलाच पूर्ण पैसे खर्च केले. जिल्ह्यात अनेक विक्रेत्यांकडे आयएसआय प्रमाणित ताडपत्री उपलब्ध नव्हत्या. या योजनेतून आयएसआय ताडपत्री घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ताडपत्रीसंबंधीदेखील फारसे प्रस्ताव आले नाहीत. बॅटरी पंपला दोन हजार रुपये तर पलटी नांगरसाठी २० हजार रुपये अनुदान मागील वित्तीय वर्षीत देय होते.

या वित्तीय वर्षात (२०१८-१९) जिल्हा परिषदेने पलटी नांगरसाठीचे अनुदान वाढवून २५ हजार रुपये केले आहे. तर एचडीपीई पाईपवर प्रतिनग ४०० रुपये अनुदान देण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. बॅटरीचे पंप, ताडपत्री यावरील अनुदान मात्र वाढविलेले नाही. ज्या योजनेला अधिक प्रतिसाद मिळेल, त्यावर कमी प्रतिसाद असलेल्या योजनेचा निधी खर्च करण्यासंबंधीदेखील धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या वित्तीय वर्षात दीड कोटी रुपये एवढा निधी स्वनिधीतून कृषी योजनांसाठी देण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० लाख रुपये अधिक निधी दिल्याची माहिती मिळाली.

पलटी नांगरासाठी अनुदान वाढविले
कृषी योजनांना यंदा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. डीबीटीमुळे मागील वित्तीय वर्षात तीन योजनांना कमी प्रतिसाद मिळाला. पलटी नांगर, बॅटरी पंपसंबंधी चांगली मागणी होती. ती लक्षात घेऊन पलटी नांगरासाठी अनुदान वाढविले आहे. तसेच एचडीपीई पाईप योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अनुदान वाढवून ते प्रतिनग ४०० रुपये केले आहे.
- नंदकिशोर महाजन,
उपाध्यक्ष तथा सभापती कृषी समिती, जिल्हा परिषद, जळगाव

 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...