agrowon marathi special news regarding solar pump. | Agrowon

सौरऊर्जेद्वारे चार हजार गावांना शाश्वत पाणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

वेळेवर वीज उपलब्ध न झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही समस्या कमी करण्याकरिता वीज सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे चार हजार गावांतील नागरिकांना शाश्वत पाणी मिळाले आहे. 
- शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे

ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास चार हजार १८९ गावांचा पाणीप्रश्न सुटला असून नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ज्या वाड्या, वस्त्या विंधन विहिरींवर अवलंबून आहे. अशा वाड्या वस्त्याकरिता २००९-१० पासून सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. ज्या वाड्या वस्त्याजवळ विद्युत पुरवठा उपलब्ध नाही, विद्युत पुरवठा घेणे किफायतशीर नाही, तसेच ज्या ठिकाणचा विद्युत पुरवठा शाश्वत नाही, ज्या वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्याकरिता केवळ हात पंपावरच अवलंबून आहेत. अशा वाड्या वस्त्यांकरिता ही अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमध्ये विंधण विहिरीवर हात पंपासमवेत सौरपंपाची उभारणी करण्यात येते. सौरऊर्जा पंपाचा उत्सर्ग साठवण टाकीत साठवून पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा करण्यात येतो. हात पंप व सौरपंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधण विहिरीत केली असल्याने हातपंप नादुरुस्त झाल्यास सौरपंपाद्वारे किंवा सौरपंप नादुरुस्त झाल्यास हात पंपाद्वारे अव्यातपणे पाणीपुरवठा सुरू राहतो. ही योजना सौरऊर्जेवर आधारित असल्याने विद्युतभाराचा खर्च निरंक आहे. या योजनेची देखभाल दुरुस्ती अत्यंत सुलभ आहे. 

अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या विंधण विहिरीमधील हातपंपासोबत एक अश्वशक्तीचा सौरपंप बसविण्यात येतो. या पंपाचे पाणी पाच हजार लीटर क्षमतेच्या टाकीत साठवून तीस ते चाळीस घरांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच नजिकच्या घरांच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करून विंधण विहिरींचे पुनर्भरण करण्यात येते. या योजनेची खर्चाची आर्थिक मर्यादा पाच लाख दहा हजार रुपये एवढी आहे. या प्रक्रियेत ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेता व योजना राबविण्यास गतिमानता व गुणवत्ता येण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यासाठी सुधारीत सूचना २१ जानेवारी २०१६ नुसार निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता या योजना उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये 

 •  हात पंप आणि सौरऊर्जेवर आधारित पाणीबुडी पंपाची एकाच विंधण विहिरीत उभारणी 
 • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने विकसित केलेल्या स्पेशल वॉटर चेंबरचा वापर 
 • चोवीस बाय सात शाश्वत पाणीपुरवठा  
 • घरोघरी नळाद्वारे, सार्वजनिक नळकोंडाळ्याद्वारे वस्तीजवळ पाणीपुरवठा 
 • सौरपंपासाठी बॅटरीची आवश्यकता नाही 
 • अत्यंत कमी देखभाल दुरुस्ती
 • वीजबिलाच्या खर्चाची बचत 
 • प्रदूषण विरहीत तंत्रज्ञान 

   योजनेचे फायदे 

 • वीजबिलाच्या खर्चाशिवाय घरोघरी पाणीपुरवठा 
 •  हात पंप बंद असल्यास सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा 
 •  सौरपंप बंद असल्यास हात पंपाद्वारे पाणीपुरवठा 
 •  पाण्याची पातळी खोल गेल्यास हात पंप बंद पडला, तरी ५७ मीटरपर्यंत सौर     पंपाद्वारे पाणी उपसा 
 • सौरपंप आपोआप चालू, बंद होण्याची व्यवस्था  

   जिल्हानिहाय बसविलेले सौरपंप 
पालघर १४, ठाणे १६६, रायगड १७४, रत्नागिरी ८१, सिंधुदुर्ग १३४, नाशिक ४७, धुळे ११, जळगाव ३७, नंदुरबार ३०७, नगर ३९, पुणे १५५, सातारा १०२, सांगली १८९, सोलापूर ९२, कोल्हापूर ६७, औरंगाबाद ५७,जालना १२६, परभणी १७७, हिंगोली १३६, नांदेड १४२, लातूर २१०, उस्मानाबाद ११३, बीड १४६, अमरावती ४६, यवतमाळ ९०, बुलढाणा २२, अकोला ५, वाशीम २०, नागपूर २०, वर्धा १३, भंडारा २३४, चंद्रपूर ३००, गडचिरोली ३३०, गोंदिया ३८७ 
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...