agrowon marathi special news regarding tree plantation programme in Dongargan village, Dist. Kolhapur | Agrowon

यंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प
सूर्यकांत नेटके
गुरुवार, 7 जून 2018

दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाच्या कामासोबत वृक्ष लागवडही महत्त्वाची आहे. आम्ही गावकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी श्रमदानातून दरवर्षी वृक्ष लागवडीचा संकल्प केला, तो दरवर्षी सुरूच ठेवला आहे. यंदाही आम्ही झाडे लावणार आहोत. अन्य गावांनाही आम्ही झाडे लावण्याबाबत सतत अवाहन करतो.
- कैलास पटारे, 
सरपंच, डोंगरगण (ता. जि. नगर)

श्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख असलेल्या डोंगरगण (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून यंदा अकरा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिकेत सात हजार रोपे तयार केली असून चार हजार रोपे वन विभाग देणार आहे. गावशिवार आणि परिसरात असलेल्या माळरानावर आतापर्यंत तब्बल तीन लाख झाडे लावली आहेत. या कामामध्ये युवकांचा पुढाकार अधिक असतो.

डोंगरगण येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून वृक्ष लागवड करण्याला दहा वर्षांपासूनच सुरवात केली आहे. सुरवातीला गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘बीज बॅंक'' उपक्रम राबवला. उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या झांडाच्या सुमारे सहा लाख बिया संकलित केल्या. पावसाळ्यात त्या गावशिवारात लावल्या. त्याचा चांगला फायदा झाला. गावाच्या मालकीचे परिसरात २२७ हेक्‍टर माळरान आहे. तेथे गावकरी श्रमदानातून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदतात. गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांचा अविरत उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन लाख वृक्षांची लागवड केली आहे. त्यातील १ लाख ५३ हजार झाडे जगली आहेत. त्यात पाचशे वडाची झाडे असून लिंब, चिंच, जांभूळ, आवळा, रिठा, करंजी यासह औषधी वनस्पतीचा समावेश आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीचे काम सुरूच असून यंदा करा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यंदा गावाने पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातही सहभाग घेत गावशिवारात तब्बल दीड महिना दिवस-रात्र श्रमदान केले आहे.

   गावात पडणारा पाऊस, त्याचे होणारे व्यवस्थापन, पर्जन्यमापक बसविण्यासह सात हजार वृक्ष लागवड, त्यावर होणारा खर्च, तसेच पाणीवापराबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. श्रमदानातून लाखो लिटर पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय झाला. यामध्ये पाणीवापराबाबतची माहिती, गावात पडणारा पाऊस, जनावरांच्या वर्गवारीनुसार त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी, गावातील प्रत्येक कुटुंबाला रोज लागणारे पाणी व पाणीबचतीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. गावात होणाऱ्या पावसाची नोंद ठेवणे, श्रमदानातून झालेल्या कामाची नोंद ठेवणे, तसेच गावाच्या पूर्वेकडील डोंगरापासून पश्‍चिमेपर्यंत श्रमदानातून झालेल्या कामाचे मूल्यमापन करणे, यासाठी ग्रामस्थ संघटित होऊन प्रयत्न करणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी सात हजार रोपे तयार असून, गावठाण हद्दीत त्यांचे रोपण होणार आहे. गावातील पाचशे शेतकऱ्यांचे मातीपरीक्षण झाले आहे. सामूहिक शेतीसाठी प्रयत्न करण्याचे ग्रामसभेत ठरले आहे.

हजारे, पवारांनी केले कौतुक
डोंगरगण गावकऱ्यांनी श्रमदानातून विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाला भेट देऊन श्रमदानातून केल्या जात असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. येथील रामेश्‍वर देवस्थान सर्वदूर परिचित असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. भाविकही श्रमदानातून झालेल्या कामाचे कौतुक करतात.
 

इतर ग्रामविकास
स्वच्छतेसाठी यमाजी पाटील वाडी...आटपाडी, जि. सांगली (प्रतिनिधी) : ‘स्वच्छतेकडून...
परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘...परभणी (प्रतिनिधी)ः ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना...
सुधारित केळी शेतीतून विकास साधणारे...जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गाव केळीसाठी प्रसिद्ध...
यंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा...श्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख...
वडाळा गावाने तयार केली तब्बल २८ कोटी...पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये उत्तर...
‘जल है तो कल है’चा मंत्र धामणा गावाने...पाण्याचे महत्त्व समजलेल्या धामणा (ता. जि. नागपूर...
स्वच्छता, पाणी, शिक्षण, अारोग्यावर...ढोरखेडा (ता. मालेगाव, जि. वाशीम) हे गाव...
ग्रामविकासाच्या नव्या संकल्पना स्पष्ट...तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील सरपंच...
कचरा प्रक्रियेद्वारे गांडूळखत...गावे आणि शहरांमधून सध्या कचऱ्याचा ज्वलंत प्रश्न...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
दुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला...दर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध...
युवकांनी घेतली ग्राम विकासाची जबाबदारीशेतकरी, शेतमजुरांच्या मुलामुलींना शालेय जीवनातच...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
शिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती...नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या...
ग्रामपंचायत स्तरावरील कामे मुदतीत पूर्ण... ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे दिलेल्या...
हस्ता गावाने एकजुटीने पकडला विकासाचा...अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता...
‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडेपुणे जिल्ह्यातील डोणे येथे वीस शेतकऱ्यांनी डोणूआई...
वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...
सामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले...सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच...
शिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालनाआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि...