स्वच्छतेसाठी यमाजी पाटील वाडी ग्रामस्थांचा पुढाकार

यामजी पाटील वाडी (ता. आटपाडी) ः दररोज लोकसहभागातून गावामध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाते.
यामजी पाटील वाडी (ता. आटपाडी) ः दररोज लोकसहभागातून गावामध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाते.

आटपाडी, जि. सांगली (प्रतिनिधी) : ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे'चा ध्यास घेत ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आलेल्या यमाजी पाटील वाडीने विभागीय स्पर्धेत यशासाठी कंबर कसली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून हे गाव ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होते आहे. यासाठी तरुणांसह ज्येष्ठ गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांचा एकोपा आणि लोकसहभागातून यमाजी पाटील वाडीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत जिल्ह्यात यश मिळवून विभागीय स्तरावर झेप घेतली आहे. आता विभागीय स्मार्ट ग्रामस्पर्धा सुरू झाली आहे. यमाजी पाटील वाडी हे गाव स्पर्धेत उतरले आहे. गावातील आबालवृद्धांसह युवकांनी श्रमदान सुरू केले आहे. दररोज गावाची स्वच्छता केली जाते. संत गाडगेबाबांची श्रमदानाची शिकवण यमाजी पाटील वाडीने अठरा वर्षे जपली आहे. स्वच्छतेसाठी हाक दिल्यावर सारा गाव एकवटतो. आपलं गाव आपणंच स्वच्छ ठेवायचं, अशी खूणगाठ बांधत कोपरा ना कोपरा स्वच्छ करण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत. गावातील सुका कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा समिती प्रयत्न करीत आहे; तसेच गांडूळखत प्रकल्प तयार होत आहे. सर्व ग्रामस्थ विभागीय यशासाठी स्वच्छतेसाठी आर्थिक भार उचलत आहेत. त्यामुळे अभियानाला बळही प्राप्त झाले आहे. प्रत्येक घर आणि गाव स्मार्ट ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी वाटा उचललेला आहे.

  • दररोज सकाळी ग्रामस्थांकडून गावात होते स्वच्छता
  • प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचे फलक
  • घरोघरी स्वच्छतेची दिली जाते माहिती
  • स्मार्ट शाळेची उभारणी, शाळेला ‘आयएसओ` मानांकन.
  • बक्षीस जिंकण्याचा ध्यास "गाव स्वच्छ व सुंदर'साठी समिती नेमली आहे. शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी, घनकचरा, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, घर व गाव स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज संकल्पनेनुसार कामकाज, सामाजिक एकता, लोकसहभाग; तसेच वैयक्तिक आणि सामूहिक पुढाकारातून गावविकासासाठी विविध उपक्रम चालवले जात आहेत. त्यामुळे गाव विभागीय बक्षीस जिंकण्याच्या ध्यासाने सज्ज झाले आहे.   ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छतेकडे... अठरा वर्षांपासून हे गाव ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेत आहे. योग्य नियोजन आणि गावातील सर्वांचे सहकार्य नेहमीच लाभते. या वर्षी जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात यश मिळवले आहे. आता विभागीय स्तरावर यश मिळविण्यासाठी झोकून काम करत आहोत. सौ. गोदावरी मोहन चव्हाण, (सरपंच, यमाजी पाटील वाडी, ता. आटपाडी, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com