agrowon marathi special news regarding village development | Agrowon

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नऊ गावांची निवड
माणिक रासवे
गुरुवार, 28 जून 2018

परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील नऊ गावांची निवड झाली आहे. या गावांच्या शाश्वत विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी ग्रामविकास, कृषी विभाग; तसेच अन्य विभागांच्या योजना प्राधान्याने लोकसहभागातून राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तीन गावांमध्ये शेतकरी गटांमार्फत दाल मिल सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी दिली.

परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील नऊ गावांची निवड झाली आहे. या गावांच्या शाश्वत विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी ग्रामविकास, कृषी विभाग; तसेच अन्य विभागांच्या योजना प्राधान्याने लोकसहभागातून राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तीन गावांमध्ये शेतकरी गटांमार्फत दाल मिल सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी दिली.

मानवी विकास निर्देशांक कमी असलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत पालम तालुक्यातील सिरसम, कापसी, रोकडेवाडी, नाव्हलगाव, गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी, मसनेरवाडी, डोंगरजवळा, बेलवाडी, पूर्णा तालुक्यातील कानडखेडा या नऊ गावांची निवड करण्यात आली आहे.
ग्राम प्रशासनाला नियोजन प्रक्रियेत मदत करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली आहे. ग्राम प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील सुसंवादतून नियोजनातील लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गावांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर होत असल्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. या अभियानांतर्गतची सर्व गावे शासनाच्या सर्व योजनांसाठी संरक्षित करण्यात आली आहेत.

या अभियानामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठीस प्रत्येक गावांमध्ये एका सामाजिक परिवर्तक नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी; तसेच लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या अभियानाची प्रभावीपणे कार्यक्षमरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सहा सदस्यीय जिल्हा अभियान परिषद अभियान परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी हे या परिषदेचे अध्यक्ष असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), अग्रणी विकास संस्थेचा प्रतिनिधी, ग्रामविकास सहकारी या परिषदेचे सदस्य आहेत. कापसी, नाव्हलगाव (ता. पालम) आणि डोंगरजवळा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिायानांतर्गत शेतकरी गटांना दाल मिल मंजूर करण्यात आल्या आहेत. कापसी येथील दालमिलचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे मुख्य कार्यकारी रामनाथ सुब्रमण्यम यांच्या हस्ते रविवारी (ता.२४) झाले असे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी सांगितले.

अभियानांतर्गत ही कामे होणार 
शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान, शैक्षणिक सोयी सुविधा दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण कामे, शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसायास चालना दिली जात आहे. येत्या काळात या गावांमध्ये ई -मेडिसीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...