युवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मिती

रविराज माने
रविराज माने

सोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील मागणी अोळखून डाळिंब ज्यूसनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण, आउटसोर्सिंग, उद्योजकाची विकसित केलेली मनोवृत्ती, दूरदृष्टी आदी गुणांच्या जोरावर त्यात आघाडी व अन्य उत्पादनांच्या आधारे विस्तारही केला आहे. ‘फ्रेश फार्म वंडर’ हा त्याचा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला आहे. 

  • रविराज माने :  युवा शेतकरी, शिक्षण - बीएस्सी- जैवतंत्रज्ञान
  • निवास : सोलापूर, शेती (सात एकर) वांगी (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) (सोलापूरपासून सुमारे १५ किमी.)
  • नोकरीपेक्षा उद्योगाला पसंती
  •   पदवी घेतल्यानंतर रविराजने नोकरी हा विषय करिअरसाठी ग्राह्य धरला नव्हताच. त्याऐवजी उद्योगाला पसंती दिली. सुरवातीला शेळीपालनासारखे काही प्रयोग केले.  पण, अभ्यासातून डाळिंब प्रक्रिया अधिक महत्त्वाची वाटून त्यातच उतरण्याचा निर्णय घेतला. वडील गोरख आपला व्यवसाय सांभाळून शेती करायचे, त्यांचाही पाठिंबा मिळाला. 

    उद्योगनिर्मितीतील टप्पे

    प्रशिक्षण 

  •  राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, (एनआरसी)
  • शाखा :  डाळिंब ज्यूस प्रक्रिया तंत्रज्ञान, येथे एक महिना अभ्यासक्रम (ज्यूस, जॅम, जेलीनिर्मिती)
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अन्नतंत्र व प्रक्रिया विभाग येथेही एक महिना अभ्यासक्रम 
  • निर्मिती सुरू    सन २०१६ मध्ये शेतातच लघू स्वरूपात ज्यूसनिर्मिती सुरू. मात्र त्यात फारसे यश मिळाले नाही. प्रक्रिया उद्योगातील भांडवलही सहजासहजी झेपणारे नव्हते. मग पुढील पर्याय निवडला.

    तंत्रज्ञान करार :    एनआरसी व रविराज माने

    डाळिंब ज्यूस तंत्रज्ञान निर्मिती  

  • बॉटलवर तसे नामकरण
  • भाडेतत्त्वावर तेथील मशिनरीचा उपयोग केला. 
  •  झालेली निर्मिती- १० हजार बॉटल्स (प्रति २०० मिलि) 
  • तीस रुपयांप्रमाणे विक्री  
  •  खर्च वजा जाता बऱ्यापैकी नफा मिळाला, उत्साह व आत्मविश्वास वाढला.
  • खासगी कंपनीशी करार :  ग्राहकांना ज्यूस पसंत पडल्याचे लक्षात आले. पुढे संशोधन केंद्राचा करार संपला. 

    सध्याचा उद्योग : आउटसोर्सिंग 

  • सोलापूर :  चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनी
  • रविराज  :  ज्यूसचे फॉर्म्युलेशन देतात. (फ्लेवरनुसार) - त्यानुसार कंपनी उत्पादन करून देते. 
  • क्वालिटीची खात्री

  • संबंधित कंपनीच्या प्रयोगशाळेत ज्यूसचे नमुने तपासून क्वालिटी सांगितली जाते. 
  • खासगी प्रयोगशाळेतही नमुना पाठवून फेरतपासणी केली जाते. 
  • त्यानंतरच उत्पादन विक्रीस उपलब्ध केले जाते. 
  • उद्योगाचा विस्तार

  • प्युअर ड्रिंक्‍स, रेडी टू सर्व्ह प्रकार, जॅम, जेली 
  •   ब्रॅंड  : फ्रेश फार्म वंडर 
  • उत्पादने   

  • डाळिंब ज्यूस  (विविध फ्लेवरयुक्त)   :   कच्चा माल स्वतःच्या बागेतून    (उत्पादन एकरी १२   टनांपर्यंत)
  •  मॅंगो मॅजिक्‍स, कैरी मॅजिक्‍स, लिची मॅजिक्‍स, जामून मॅजिक्‍स,  कोकम मॅजिक्‍स असे   विविध फळांचे ज्यूस   :  कच्चा माल बाजार समिती व   शेतकऱ्यांकडून 
  • पॅकिंग                                            २०० मिलि
  •  दर                                                 २३ रु.  
  • उत्पादन खर्च प्रतिबॉटल                      साडेबारा रु.   
  • उत्पादन वैशिष्ट्ये

  • प्रत्येकाचा स्वाद, रंग काहीसा वेगळा
  •  ग्राहकांच्या पसंतीला उतरणारा
  •  आकर्षक लेबलिंग
  •  फूड सेफ्टीविषयक संस्थेचा परवाना
  • मालविक्रीचे नियोजन

  • मॉलमधील आघाडीच्या ब्रॅंडला (सोलापूर) २१० बॉटल्स व डाळिंबेही दिली. 
  • पुणे, सोलापूर आदी विविध प्रदर्शनांमधून ज्यूसची विक्री
  • सोलापुरातील पंचतारांकित हाॅटेल व अन्य शहरांतील हाॅटेल्ससोबत करार,वेलकम ड्रिंकसाठी  
  • प्रमोशन 

  • जागतिक ग्राहक दिनाला (डिसेंबर, २०१७) डाळिंब महोत्सव आयोजित करून शेतकरी, एनआरसी तज्ज्ञ व अन्य लोकांना बोलावून आपल्या उत्पादनांचे प्रमोशन केले. 
  • उद्योगात मदत

  •   छोटा भाऊ- आदर्श - बीएस्सीचे (हॉर्टिकल्चर) शिक्षण सुरू. 
  •  याशिवाय वडील, चुलतभाऊ यांचीही विक्रीत साथ 
  • कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक सन २०१५ मध्ये डाळिंबाचे एकरी पाच ते सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले; पण फारसा दर मिळाला नाही. पुढील वर्षी एकरी सात टन उत्पादन व प्रतिकिलो ९० रुपये सर्वाधिक दर मिळाला. त्यापैकी काही डाळिंब प्रक्रियेसाठी ठेवले. यंदा मात्र दर नसल्याने किरकोळ विक्री केली. बाकी कोल्ड स्टोरेजमध्ये ( ज्यूससाठी). कमी पडल्यास बाहेरूनही खरेदी.  

    होम डिलिव्हरी 

    ठिकाण - सोलापूर 

  •  ‘फोन घुमाओ, डाळिंब मंगाओ’ संकल्पनेतून ग्राहकांनी फोनवरून ऑर्डर करायची.
  •  काही वेळातच घरपोच डाळिंबे.
  •   गरजेनुसार बाजारातून खरेदी करूनही ग्राहकांपर्यंत पोचवली जातात, त्यामुळे बाजारपेठेतील उपलब्धतेनुसार दर  
  •  दर :  किलोला ५४ रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत 
  •  -   रविराज माने, ७७०९८५४००३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com