agrowon news in marathi, 15 crore turnover in mango festival, Maharashtra | Agrowon

आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

पुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत यंदाच्या आंबा महाेत्सवात १५ काेटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर १ हजार १०५ टन आंबा निर्यातीमधून २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत यंदाच्या आंबा महाेत्सवात १५ काेटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर १ हजार १०५ टन आंबा निर्यातीमधून २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

श्री. पवार म्हणाले, की काेकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक आणि ग्राहकांना विश्‍वासार्ह आणि दर्जेदार हापूस आंबा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पणन मंडळाच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येत आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार फक्त पुणे शहरात हाेणारा आंबा महाेत्सव आता विविध शहरांमध्ये आयाेजित केला जात आहे. यंदा पुणे आणि इंदूरसह २३ शहरांमध्ये महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

‘‘पुणे शहरात पणन मंडळाच्या आवारासह बालंगर्धव रंगमंदिरातदेखील आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या महाेत्सवामध्ये तळ काेकणासह मध्य काेकणातील विविध जिल्ह्यातील १०० शेतकरी सहभागी झाले हाेते. थेट शेतकऱ्यांकडून आंबा विक्री हाेत असल्याने काेणत्याही रसायनांशिवाय नैर्सगिकरीत्या पिकविलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध झाला हाेता’’, असे पवार यांनी सांगितले.

निर्यातीमधून २० काेटींचे परकी चलन 
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त शेतीमाल विविध देशांमध्ये निर्यात व्हावा, यासाठी विविध भागांमध्ये ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामधील नवीमुंबई, रत्नागिरी, देवगड, जालना, बीड, लातूर या पाच ठिकाणांवरील आंबा निर्यात केंद्रांमधून १ हजार १०४ टन आंबा निर्यात करण्यात झाला असून, याद्वारे सुमारे २० काेटींचे परकी चलन शेतकऱ्यांना मिळाले आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार यंदा १ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. मंडळाने उद्दिष्टपूर्ती करत १ हजार १०४ टन आंबा निर्यात केला असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

विविध देशांमध्ये झालेली निर्यात आणि त्याची रक्कम पुढीलप्रमाणे (काेटींमध्ये) 

देश   टन  रुपये
अमेरिका   ५४०.१८  ११.५७ 
युराेप    ४४६.७१   ५.७३ 
आॅस्‍ट्रेलिया   १७.१८  ०.३६ 
जपान    २३.६९   ०.३५
न्यूझीलंड   २८.७०   ०.७७ 
 
 रशिया       ७.५१    ०.१३
दक्षिण काेरिया    ४०.९६     ०.७५

     
    
 
    
 

 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...