agrowon news in marathi, 30 percent reduction in cotton sowing, Maharashtra | Agrowon

कापूस लागवडीत ३० टक्के घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नवी दिल्ली : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्यानंतरही पावसाचा जोर काही राज्ये वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी यंदा माघारली आहे. २९ जूनपर्यंत देशात कापसाची केवळ ३२ लाख २० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी याच काळात ४६ लाख १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत यंदा तब्बल ३०.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील सरासरी क्षेत्राच्या, एक कोटी १९ लाख ७५ हजार हेक्टरच्या तुलनेत आयातपर्यंत केवळ २६.८८ टक्केच लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा देशात कापूस लागड घटणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्यानंतरही पावसाचा जोर काही राज्ये वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी यंदा माघारली आहे. २९ जूनपर्यंत देशात कापसाची केवळ ३२ लाख २० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी याच काळात ४६ लाख १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत यंदा तब्बल ३०.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील सरासरी क्षेत्राच्या, एक कोटी १९ लाख ७५ हजार हेक्टरच्या तुलनेत आयातपर्यंत केवळ २६.८८ टक्केच लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा देशात कापूस लागड घटणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

देशात यंदा माॅन्सून वेळेच्या आधी दाखल झाला आणि वेळेआधीच पूर्ण देश व्यापला. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरणीने वेग घेतला नाही. २९ जून २०१८ पर्यंत देशात १६५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यात कापूस लागवड घटल्याचे चित्र आहे. नगदी पीक म्हणून कोरडवाहू तसेच हंगामी बागायती शेतीत शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र २०१६-१७ च्या हंगामात पंजाब, हरियाना आणि गुजरात राज्यात बोंड अळीने धुमाकूळ घातला. पंजाब आणि हरियाना दोन्ही राज्यांमध्ये तेव्हा जवळपास ४० टक्के नुकसान झाल्याचे तेथील सरकारांनी स्पष्ट केले होते. मागील हंगामात या तीनही राज्यांनी बोंड अळी नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात यशही आले. 

मात्र, २०१७-१८ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. ही तीनही राज्ये कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने त्याचा परिणाम देशातील कापूस उत्पादनावर झाला. महाराष्ट्रात बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त जाणवला. येथील शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पहिल्याच टप्प्यात बोंड अळी आल्याने कापूस कमी दर्जाचा निघाला. कवडीयुक्त कापसाला तर मातीमोल भाव मिळाला. दर्जायुक्त कापूस नसल्याने दर नाही आणि मजुरीचे दर मात्र जास्त, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचनीच बंद केली आणि कापूस सोडला. 

गेल्या हंगामात बोंड अळीने हाहाकार केला. मात्र नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजनांचा अभाव जाणवला. त्यामुळे २०१८-१९ च्या हंगामात शेतकरी पर्यायी पिकांकडे वळतील असा अंदाज तज्ज्ञांनी सुरवातीलाच व्यक्त केला होता. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी कापूसाची लागवड कमी करुन इतर पर्यायी पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. 

खरिपात कडधान्य पेरणीतही घट झाली आहे. कडधान्याची १० लाख ७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील वर्षी याच काळात १८ लाख २ हजार हेक्टरवर पेरा होता. तेलबिया लागवडीतही ४४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा १४ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी २६ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मका पेरणीतही सहा टक्क्यांनी घट होऊन १५ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...