agrowon news in marathi, 747 crore distributed to farmers, Maharashtra | Agrowon

पीकविमा नुकसानभरपाईचे ७४७ कोटी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या खरिपातील पीकविमा भरपाईपोटी एक हजार ८८२ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. त्यापैकी ७४७ कोटी रुपये डीबीटीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाले आहेत. तर काही कंपन्यांकडून २१ लाख शेतकऱ्यांसाठी ११३५ कोटी बॅंकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होणार आहे.

पीकविमा योजनेतून खरीप २०१७ मधील हंगामातील नुकसान भरपाई वाटपाचे काम बॅंकांच्या पातळीवर सुरू आहे. काही बॅंकांकडून विम्याच्या रकमा थेट कर्जखाती भरून घेतल्या जात असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. 

पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या खरिपातील पीकविमा भरपाईपोटी एक हजार ८८२ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. त्यापैकी ७४७ कोटी रुपये डीबीटीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाले आहेत. तर काही कंपन्यांकडून २१ लाख शेतकऱ्यांसाठी ११३५ कोटी बॅंकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होणार आहे.

पीकविमा योजनेतून खरीप २०१७ मधील हंगामातील नुकसान भरपाई वाटपाचे काम बॅंकांच्या पातळीवर सुरू आहे. काही बॅंकांकडून विम्याच्या रकमा थेट कर्जखाती भरून घेतल्या जात असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. 

भारतीय कृषी विमा कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अशा पाच विमा कंपन्यांनी गेल्या खरिपात शेतकऱ्यांकडून विमाहप्ता गोळा केला होता. शासनाकडूनदेखील हप्त्यापोटी या कंपन्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. या कंपन्यांनी एकूण किती रक्कम गोळा केली व किती वाटप होत आहे याविषयीची अंतिम माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.  

‘‘विमा कंपन्यांमार्फत गेल्या खरिपातील नुकसान भरपाई निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार ८८२ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. ऐन खरिपात शेतकऱ्यांच्या हाती विमा कंपन्यांकडून भरपाईच्या रकमा दिल्या जात असल्याने त्याचा उपयोग चालू खरिपातील कामांसाठी करता येईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 
विमा कंपन्यांना भरपाईच्या रकमा अदा करूनही बॅंकांकडून रकमा दाबून ठेवल्या जातात. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना डीबीटीने भरपाई देण्याचा प्रयत्न झाला आहे. १२ लाख ६२ हजार शेतकऱ्यांना डीबीटीतून ७४७ कोटी २८ लाख रुपये थेट बॅंक खात्यात उपलब्ध झाले आहेत. 

राज्यातील २१ लाख ३५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत एक हजार १३५ कोटी रुपये कोटी बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. बँकनिहाय वितरीत करण्यात आलेल्या निधीचा शेतकरीनिहाय तपशिल कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. 

संबंधित बॅंकामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत नुकसान भरपाई जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास संबंधित विमा कंपनी किंवा कृषी खात्याशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...