कृषी पदवीसाठी ७८ हजार अर्ज
कृषी पदवीसाठी ७८ हजार अर्ज

कृषी पदवीसाठी ७८ हजार अर्ज

पुणे :  राज्यातील कृषी पदवीच्या १५ हजार २२७ जागांसाठी प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून सहा जुलैपर्यंत ७८ हजार अर्ज आले आहेत. बीएसस्सी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मत्सशास्त्र, पशुसंवर्धन याच अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळालेला आहे. यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम अजूनही व्यावसायिक म्हणून जाहीर झालेला नाही.  राज्यातील खासगी कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांच्या प्रवेश कोट्यातील प्रवेशदेखील यंदा गुणवत्ता यादीतून होणार आहेत. १८७ महाविद्यालये सध्या दहा विद्याशाखांचा पदवी अभ्यासक्रम शिकवतात. त्यात ३१ शासकीय, दोन अनुदानित आणि १५४ कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.   ऑनलाइन अर्जामध्ये साधारण गटात २०२६२ अर्ज आले आहेत. ओबीसीतून २१०७७, एसबीसी ८४७, एससी ७७५६, एसटी ३०३४ यांसह एकूण ४२ हजार ६४२ अर्ज राखीव गटातून आलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत http://www.dtemaharashtra.gov.in / http://www.mcaer.org / maha-agriadmission.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.   पदवीसाठी पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी २६ जुलैला जाहीर होईल. तीन ऑगस्टला दुसऱ्या फेरीची यादी, ९ ऑगस्टला तिसऱ्या व १६ ऑगस्टला चौथ्या फेरीतील वाटप यादी जाहीर होणार आहे, असे परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com