agrowon news in marathi, 80 crore required for eNam, Maharashtra | Agrowon

‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत ८० कोटी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत बाजारपेठेमध्ये कुठेही विक्री करता यावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आॅनलाईन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम)मध्ये राज्यातील नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १४५ बाजार समित्यांसाठी ८० काेटींच्या निधीची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन प्रत्येक बाजार समितीसाठी ३० लाखांचा निधी देणार आहे. 

पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत बाजारपेठेमध्ये कुठेही विक्री करता यावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आॅनलाईन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम)मध्ये राज्यातील नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १४५ बाजार समित्यांसाठी ८० काेटींच्या निधीची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन प्रत्येक बाजार समितीसाठी ३० लाखांचा निधी देणार आहे. 

केंद्राच्या ५८५ बाजार समित्यांमध्ये राज्यातील ६० बाजार समित्यांचा समावेश अगाेदरच झाला असून, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामध्ये २५ बाजार समित्यांचा समावेश झालेला आहे. अशा एकूण ८५ बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली कार्यान्वित झाली आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

दरम्यान, ई-नामची संगणकप्रणाली देश पातळीवर एकच असून, प्रत्येक बाजार समितीमधील शेतीमाल विक्री पद्धध वेगवेगळी असल्याने संगणकप्रमाणींमध्ये विविध बदल करण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी बाजार समित्यांनी पणन मंडळासह, केंद्राला केली आहे. तर ई-नामच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी स्वंतत्र यंत्रण बाजार समित्यांमध्ये उभारण्याची गरज असल्याचे मत बाजार समित्यांकडून व्यक्त हाेत आहे.

नाशवंत आणि अतिनाशंवत शेतीमाल तातडीने बाजारपेठेत पाठविण्यासाठी आॅनलाइन लिलाव हाेणे गरजेचे आहे. यासाठी शीतगृहे, पॅकिंग सुविधा आणि माेठी लिलाव गृहे बाजार समित्यांमध्ये उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतीमालांचे आॅनलाइन लिलाव हाेत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. यासाठी तातडीने पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी बाजार समित्यांसह शेतकऱ्यांकडून हाेत आहे. 

या आहेत १४५ बाजार समित्या
जिल्हा : बाजार समिती
 ठाणे :
कल्याण, उल्हासनगर, वसई, भिवंडी, शहापूर,
 वाशीम : कारंजा, रिसाेड, वाशीम,
 रायगड : पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत,  
 नाशिक : उमराणे, सटाणा, सिन्नर, कळव, मनमाड, नामपूर, नांदगाव, देवळा, घाेटी
 नंदुरबार : नवापूर, तळाेदा, 
 यवतमाळ : राळेगाव, यवतमाळ, घाटंजी, पुसद, आर्णी, उमरखेड, माेरगाव, पांढरकवडा, बाभुळगाव, दिग्रस, झरीझमिनी, नेर पारसाेपंत, महागाव. 
 जळगाव : जळगाव, पाचाेरा, जामनेर, यावल, रावेर, चाळीसगाव, पाराेळा, बाेडवड, धरणगाव, भुसावळ, 
 पुणे  : मंचर, नीरा, 
 वर्धा : आर्वी, पुलगाव, समुद्रपूर, आष्टी, 
गडचिराेली : चार्माेशी, आरमाेरी, सिराेंचा, गडचिराेली. 
 नागपूर : कळमेश्‍वर, उमरेड, सावनेर, नरखेड, भिवापूर, माैडा, कामठी, रामटेक, मांधळ, हिंगणा,
 साेलापूर :  कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकाेट, मंगळवेढा
 लातुर : आैसा
 आैरंगाबाद : सिल्लाेड, लासूर स्टेशन, पैठण, गंगापूर, कन्नड, फुलंब्री
 बीड : परळी वैजनाथ, किल्ले धारुर, माजलगाव, केज, कडा, आंबेजाेगाई, वडवणी, 
 नगर : श्रीरामपूर, शेवगाव, पारनेर, श्रीगाेंदा, काेपरगाव, पाथर्डी, कर्जत, अकाेले, 
 बुलडाणा : देऊळगावराजा, जळगाव जामाेद, बुलडाणा, नांदुरा, संग्रामपूर, 
 अमरावती : वरुड, माेर्श, चांदुररेल्वे, 
 चंद्रपूर : मूल, नागभीड, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमुर, सावळी, सिंदेवाही, गाेंडपिप्री, काेर्पणा, 
 परभणी : मानवत, गंगाखेड, पाथरी, साेनपेठ, 
 उस्मानाबाद : उमरगा, कळंब, उस्मानाबाद, मुरुम, 
 सातारा : सातारा, वाई, 
 काेल्हापूर : वडगांवपेठ, गडहिंगलज, जयसिंगपूर, 
 सांगली : इस्लामपूर, पलुस, 
 रत्नागिरी : रत्नागिरी 
 अकाेला : तेलहरा 
 वाशीम : मनाेरा, माळेगाव, 
 जालना : भाेकरदन, अंबड, परतूर 
 गाेंदिया : तिराेडा, आमगाव, देवरी, सडकअर्जुनी.
 भंडारा : लाखणी, पवणी, लाखांदूर 
 जालना : मंठा, घनसावंगी, जाफ्रराबाद, 
 नांदेड : देगलुर, हदगाव, हिमायतनगर
 हिंगाेली : जावळा बाजार.

लिलावाची बाेली माेबाईलवर कळावी 
ई-नामच्या व्यवस्थेमध्ये शेतीमालाच्या लिलावाची बाेली बाजार समितीच्या डिजिटल बाेर्डवर दिसते. यासाठी शेतकऱ्यांना स्वतःला बाजार समितीमध्ये उपस्थित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना शेतात काम करत असतानादेखील आपण पाठविलेल्या शेतीमालाच्या लिलावाची बाेली माेबाईलवर उपलब्ध व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.   
 

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...