दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा : सतेज पाटील

दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा : सतेज पाटील
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा : सतेज पाटील

वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा चक्रव्यूहात दूध उत्पादक अडकला आहे. एका बाजूला महागाईने कंबरडे मोडले आहे. दुसऱ्या बाजूला ज्या संस्था दूध देत आहे त्या संस्था दूध देत नाहीत. अशी वाईट परिस्थिती सध्या आहे. राज्य शासन दूध उत्पादकांसाठी साखर कारखान्याप्रमाणे ७०:३० असा फॉर्म्यूला करण्याच्या विचारात आहे; पण माझ्या मते हे अतिशय चुकीचे आणि अन्यायकारी होणार आहे. संघ सांगत आहेत की आम्ही ८५ टक्केपर्यंतचा नफा उत्पादकांना देत आहेत; परंतु हे सरळ सरळ चुकीचे आहे. दूध हा एकच पदार्थ असा आहे, की ज्यापासून डब्बल दर मिळतो. आणि त्यापासून अनेक उपपदार्थ तयार होतात. या उपपदार्थ निर्मितीपासून मिळणारा दर हा संघांना मिळू शकतो. महाराष्ट्रातील दूध संघाच्या बाबतीत विचार केला, तर त्यांची मुंबई ही मुख्य बाजारपेठ आहे. पण गोकुळसारख्या अग्रगण्य संघांनीही वितरक वाढविण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे मार्केट आहे तिथेच राहिले आहे. संघाच्या व्यवस्थापनाने फार त्रास न घेता बाजारपेठ वाढू दिले नाही. मुंबई ही इतकी मोठी बाजारपेठ आहे की तिथे दूध पावडरीची सहज विक्री होते. पण याकडे राज्यातील कोणतेही संघ गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. नियोजनशून्य कारभार संघाचा आहे, यामुळे हे संकट आले आहेत. दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांचे वाढलेले खर्च उत्पादकांना नुकसानीत आणत आहेत. काही संघ म्हणतात, की आम्ही नफ्यातील ८५ टक्के रक्कम उत्पादकांना देतो. जर यांनी खर्च कमी केला तर तो ९५ टक्केपर्यंत जातो; परंतु असे करायला कोणीही तयार नाही. यामुळे साखर कारखान्यांसाठी लागणारा ७०:३० हा फॉर्म्यूला इथे उपयोगाचाच नाही. ९५: ५ हा फॉर्म्यूला वापरला तरच शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतील. गायीचे दूध घ्यायचे त्यात म्हशीचे मिक्‍स करायचे आणि ते टोन्ड म्हणून जादा किमतीला विकायचे असे काही संघ करतात. लिटरमागे २५ रुपयांचा नेट नफा संघाना होतो; मग हा फायदा शेतकऱ्याला मिळण्यासाठी संघाच्या मार्फत का प्रयत्न केले जात नाहीत. राज्यातील दुधाचे उत्पादन व त्याचा खर्च याचा सातत्याने आढावा घेऊन एन.डी.डी.बी.ने वेळोवेळी संघांना मार्गदर्शन केले पाहिजे. राज्यातील परिस्थिती काय आहे, आता किती पावडर करावी लागेल, याचे मार्केटिंग कसे करावे लागेल याचे मार्गदर्शन  एन.डी.डी.बी.कडून होणे गरजेचे आहे. पण असे होताना दिसत नाही. एन.डी.डी.बी फक्त अमूलसारख्या बड्या ब्रॅंडला मार्गदर्शन करते का असा सवाल आहे. फक्त प्रोजेक्‍ट करा आणि पैसे द्या इतक्‍याच मर्यादित स्वरूपात कार्यरत आहेत. विस्तारीकरण गरजेचे असले तरी भविष्यातील धोरणांचा अभ्यास करून त्या प्रमाणात दूध संघाना मदत करणे आदी बाबी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत.  - सतेज पाटील, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com