मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना ९९० कोटींची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना ९९० कोटींची मदत
मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना ९९० कोटींची मदत

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून आतापर्यंत ३४० कोटी रुपयांची मदत रुग्णांना करण्यात आली आहे. तर धर्मादाय रुग्णालयांच्या वतीने एकूण १५ लाख रुग्णांवर सुमारे ६५० कोटी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयांत रुग्णांवर होणाऱ्या उपचारांव्यतिरिक्त एकंदरीत सुमारे ९९० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत राज्यातील गोरगरीब रुग्णांना सरकारकडून झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गेल्या सरकारमध्ये रुग्णाला २५ हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जात होती. गेल्या सरकारच्या कार्यकाळात केवळ ४२ कोटी रुपये रुग्णांना मदत देण्यात आली होती. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात त्यात लक्षणीय वाढ करण्यात आली. २०१५ – २०१६ या वर्षात सरकारकडे ७,०९३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४,८६७ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ८२ लाख रुपयांची मदत देण्यात आली. २०१६- २०१७ या वर्षात १७,१५० अर्ज आले होते. त्यापैकी १३,१४६ रुग्णांना सुमारे १४६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. तर २०१७ -२०१८ या वर्षात आलेल्या २७,१८५ अर्जापैकी आतापर्यंत ९१३ रुग्णांना सुमारे १६० कोटी रुपये म्हणजे गेल्या तीन वर्षांत ३४० कोटी रुपयांची मदत या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून झाली आहे. धर्मादाय आयुक्तालयामार्फत निर्धन रुग्णांना म्हणजे ज्यांचे उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना मदत दिली जाते. तर १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या दुर्बल घटकातील व्यक्तींना मदत दिली जात होती. ही उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला असून आता निर्धन घटकांतील रुग्णांसाठी ८५ हजार रुपये तर दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दीड लाख रुपये मर्यादा निश्चित केली आहे. २०१५ मध्ये धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने रुग्णांवर सुमारे १७८ कोटी रुपयांचे उपचार मोफत करण्यात आले. २०१६ ला सुमारे २०८ कोटी तर २०१७ साली २६२ कोटी रुपयांचे मोफत उपचार रुग्णांवर करण्यात आले. असे एकूण १५ लाख रुग्णांवर सुमारे ६५० कोटी रुपयांचे मोफत उपचार तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३५ हजार रुग्णांना सुमारे ३४० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत सुमारे ९९० कोटी रुपयांच्या घरात जाते. म्हणजे शासकीय रुग्णालयांत रुग्णांवर होणाऱ्या उपचाराव्यतिरिक्त सुमारे ९९० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत राज्यातील गोरगरीब रुग्णांना सरकारकडून झाली असून, हे मोठे यश असल्याचे श्री. शेटे यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्यातील लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंडाचे आजार, अपघातात झालेल्या मोठ्या इजा तसेच अन्य रोगांवर उपचार केले जातात. राज्यातील धर्मादाय आयुक्तांच्या वतीने खासगी आणि निमशासकीय रुग्णालयामध्ये हे उपचार केले जातात. तर खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादायच्या वतीने १० टक्के अधिक १० टक्के असे गरीब रुग्णांसाठी २० टक्के आरक्षण खासगी रुग्णालयांमध्येही ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांनी या योजनेतून रुग्णांवर उपचार केले, मात्र त्यांच्याकडून खर्च घेतला होता, त्या रुग्णांना केलेला खर्चही संबंधित रुग्णालयांकडून परत मिळवून दिला असल्याचे शेटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com