agrowon news in marathi, According to soil testing, the use of nutrients is important ःSalunkhe | Agrowon

माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वाचा ः साळुंखे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

सांगली ः ऊस उत्पादन घेताना पिकाला काय दिले पाहिजे, याचा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. उसाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता समजावून घ्या. यासाठी माती परीक्षण करावे, असा सल्ला ऊसतज्ज्ञ ए. एन. साळुंखे यांनी दिला.

सांगली ः ऊस उत्पादन घेताना पिकाला काय दिले पाहिजे, याचा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. उसाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता समजावून घ्या. यासाठी माती परीक्षण करावे, असा सल्ला ऊसतज्ज्ञ ए. एन. साळुंखे यांनी दिला.

गोटखिंडी येथे `ॲग्रोवन` आणि `महाधन` यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ॲग्रोसंवाद कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना ए. एन. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच विजय लोंढे, उपसरपंच नंदकुमार पाटील, महाधन कंपनीचे पंकज गोंजारी, सुधाकर जगदाळे, रवींद्र वाघमोरे, विपीन कांबळे, अवधूत पाटील, प्रगतशील शेतकरी अमोल लकेसर, अमर पाटील, संदीप पाटील, बाळासोा गुरव, 
अशोक खोत, धनाजी पवार उपस्थित होते.

ए. एन. साळुंखे म्हणाले, की उसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी अतिरिक्त खतांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होत असून, जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. शेतकऱ्यांनी प्रथम मातीपरीक्षण करून घ्यावे. त्यानुसार जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत, त्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. रासायनिक खतांचा वापर करत असताना सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा आहे. 

साळुंखे म्हणाले, की ऊस लागवड पट्टा पद्धतीने करावी. दिलेली खते मातीआड करावीत. ऊस पाचटाचे आच्छादन करावे. यामुळे उसाची चांगली वाढ होऊन वजन वाढण्यास मदत होते.
महाधन कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक पंकज गोंजारी यांनी महाधन खतांची वैशिष्‍ट्ये, कार्यपद्धती आणि कंपनीची माहिती दिली. प्रास्ताविक ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी अभिजित डाके यांनी केले, तर गजानन पवार यांनी आभार मानले.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...