agrowon news in marathi, action on bank due to less crop loan distribute, Maharashtra | Agrowon

पीककर्ज वाटपात दिरंगाई, कॅनरा बॅंकेलाही दणका
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

अकोला ः पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या कॅनरा बॅंकेला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी झटका दिला आहे. जिल्ह्यात या बॅंकेच्या असलेल्या सर्व शाखांमधील शासकीय खाती बंद करण्याबाबत यंत्रणांना निर्देश दिले आहेत. यापूर्वी पीककर्ज वाटपाच्या कारणावरून ॲक्‍सिस बॅंकेतून ४५ कोटी रुपये काढून घेण्यात आलेले आहेत. 

अकोला ः पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या कॅनरा बॅंकेला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी झटका दिला आहे. जिल्ह्यात या बॅंकेच्या असलेल्या सर्व शाखांमधील शासकीय खाती बंद करण्याबाबत यंत्रणांना निर्देश दिले आहेत. यापूर्वी पीककर्ज वाटपाच्या कारणावरून ॲक्‍सिस बॅंकेतून ४५ कोटी रुपये काढून घेण्यात आलेले आहेत. 

जिल्हाधिकारी श्री. पांडेय हे शुक्रवारी (ता. १५) पातूर तालुक्‍यात पीककर्जाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना कॅनरा बॅंकेच्या पातूर शाखेतील अधिकारी, कर्मचारी हे पीककर्ज वाटपाबाबत हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत आहेत. खातेदार शेतकऱ्यांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीककर्ज योजनेपासून वंचित ठेवत आहेत. पात्र असूनही खातेदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगून जबाबदारी टाळत आहेत. बॅंकेची ही नकारात्मक भूमिका पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या बॅंकेच्या जिल्ह्यात असलेल्या सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करून हे खाते पीककर्ज वाटपात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बॅंकेत उघडावेत असे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर पातूरमधील सर्व शासकीय खाती शुक्रवारीच बंद करून पीककर्ज वाटप करणाऱ्या बॅंकेत उघडण्याची कार्यवाही सुुरू करण्यात आली. 

अनावश्‍यक कागदपत्रे मागितल्यास फौजदारी 
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बॅंक व जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या एका आदेशाद्वारे पीककर्जासाठी शेतकऱ्याकडून अनावश्‍यक कागदपत्रे न घेण्याबाबत सुचविले आहे. सध्या पीककर्ज वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. खरीप हंगाम पेरण्या सुरू असून, शेतकरी बॅंकांकडून पीककर्जासाठी अर्ज देत आहेत. मात्र बॅंकांकडून शेतकऱ्यांना हैसियत दाखला, भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळणारा नकाशा, लीगल सर्च रिपोर्ट, रजिस्टर गहाणखत तसेच इतर अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बॅंकांच्या या आडकाठी धोरणामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. हे लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत उपरोक्त अनावश्‍यक दाखले न घेण्याबाबत लीड बॅंक व जिल्हा उपनिबंधकांनी त्यांच्या अधिनस्थ बॅंकांना सूचित करण्याचे सांगितले आहे. यापुढे या संदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल झाल्या आणि त्यात तथ्य आढळले तर संबंधित बॅंक व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...