नियमनमुक्तीनंतरही अडत सुरूच : मंत्री देशमुख यांची कबुली

पुणे ः अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत पुणे ते पंढरपूर आषाढी वारी चित्ररथ उद्‌घाटन वारकरी विश्वनाथ शेटे (रा. अकाेले, जि. नगर) यांच्या हस्ते झाले.
पुणे ः अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत पुणे ते पंढरपूर आषाढी वारी चित्ररथ उद्‌घाटन वारकरी विश्वनाथ शेटे (रा. अकाेले, जि. नगर) यांच्या हस्ते झाले.

पुणे ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतरही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अडत वसूल हाेत आहे, अशी कबुली सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत पुणे ते पंढरपूर आषाढी वारी चित्ररथ उद्घाटन कार्यक्रमात रविवारी (ता. ८) मंत्री देशमुख बाेलत हाेते. सरकारने शेतकरीहिताचे विविध निर्णय घेतले. मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे हाेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतरही बाजार समित्यांमध्ये अडते शेतकऱ्यांकडून अडत वसुल करत आहेत. अशाप्रकारे अडत वसूल हाेत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे कराव्यात, संबंधित अडत्यांवर कारवाई केली जाईल, असेही देशमुख म्हणाले.   ‘‘सरकारच्या अनेक याेजना असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे याेजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यासाठी पणन सुधारणांमधील बदल आणि विविध याेजनांची माहिती वारीच्या निमित्ताने लाखाे शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गांवर दाेन चित्ररथ सादर करण्यात आले आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून विविध याेजनांची माहिती लाखाे शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविण्याचा प्रयत्न असणार आहे,’’ असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.   दरम्यान, अटल महापणन अभियानाअंतर्गत विकास साेसायट्यांचे सक्षमीकरण करण्यात येत असून, विकास साेसायटीच्या माध्यमातून प्रत्येक गावाचे वैशिष्ठ्य असलेल्या शेतमालाचे विपणनातून गावाची आेळख निर्माण हाेणे गरजेचे आहे. यामाध्यमातून गावातील पैसा गावातच रहावा आणि ‘मेक इन इंडिच्या‘ धर्तीवर ‘मेक इन व्हिलेज‘ संकल्पना यशस्वी व्हावी, अशी अपेक्षाही मंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.  या वेळी चित्ररथाचे उद्घाटन वारकरी विश्वनाथ   शेटे (रा. अकाेले, जि.नगर) यांच्या हस्ते झाले. या वेळी पणन मंत्री देशमुख यांच्यासह पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड, सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, अटल महापणन विकास अभियानाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजाराम दिघे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, माजी आमदार दिलीप बनकर, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख आदी मान्यवर उपस्थित हाेते. पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com