agrowon news in marathi, administration and APMC not commented on cess recovery, Maharashtra | Agrowon

सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव बाजार समितीची चुप्पी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने शेतकऱ्याकडे थेट शेतात खरेदी केलेल्या शेतीमालावर कुठलेही कर आकारण्याचे निर्देश नसताना जिल्ह्यात विविध बाजार समित्या खरेदीदारांकडून सेवा व इतर नावांखाली शुल्क वसूल करीत असल्याने खरेदीदार आंदोलन करणार आहेत. पिंपरी- चिंचवड फळ असोसिएशन या विषयावरून राज्य शासनाकडे तक्रार करणार असून, जळगाव जिल्ह्यातील केळी खरेदी बंद ठेवणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. 

जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने शेतकऱ्याकडे थेट शेतात खरेदी केलेल्या शेतीमालावर कुठलेही कर आकारण्याचे निर्देश नसताना जिल्ह्यात विविध बाजार समित्या खरेदीदारांकडून सेवा व इतर नावांखाली शुल्क वसूल करीत असल्याने खरेदीदार आंदोलन करणार आहेत. पिंपरी- चिंचवड फळ असोसिएशन या विषयावरून राज्य शासनाकडे तक्रार करणार असून, जळगाव जिल्ह्यातील केळी खरेदी बंद ठेवणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. 

खरेदीदारांकडून शुल्क वसुलीसंबंधीचे वृत्त ॲग्रोवनने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन व बाजार समितीत खळबळ उडाली असून, या विषयावर ठोस भूमिका मांडण्यास संबंधितांनी अजून तरी टाळाटाळ केली आहे. या विषयावर जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्याशी मोबाईलवरून दुपारी संपर्क साधला असता त्यांनी आपण वरिष्ठांसोबतच्या एका बैठकीत आहोत. याबाबत नंतर सविस्तर बोलू, असे सांगितले. तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव रमेश माळी यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील हे अमेरिकेत गेल्याची माहिती मिळाली. अर्थातच प्रशासकीय यंत्रणांनी या मुद्यावर चुप्पी साधल्याची स्थिती होती.  

जिल्ह्यात केळीची खरेदी थेट शेतातच केली जाते. रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, जळगाव व जामनेर भागात केळी असते. या भागातही थेट शेतात केळीची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बाजार समित्या सेवा व इतर कारणांखाली शुल्क आकारत असल्याची कुरबूर आहे. शुल्क घेतल्यानंतर ज्या पावत्या दिल्या जातात, त्यांची कोणतीही अधिकृत नोंद बाजार समित्यांकडे नसते. पावती पुस्तकेही रेकॉर्डवर घेतले जात नसल्याची माहिती मिळाली असून, हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे एका व्यापारी संचालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने योग्य ती कारवाई केली पाहीजे, असेही या संचालकाने सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...