agrowon news in marathi, administrative change in sugar commissioner, Maharashtra | Agrowon

साखर आयुक्तालयात प्रशासकीय बदल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

पुणे : राज्याच्या साखर आयुक्तालयात प्रशासकीय बदल झाले असून डी. बी. मुकणे व शैलेश कोतमिरे यांच्याकडे संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. मात्र, उपपदार्थ विभागात काम करण्यास कोणी तयार नसल्यामुळे हा विभाग अजूनही वाऱ्यावर आहे. भूविकास बॅंकेचे अवसायक असलेले अपर निबंधक श्री. मुकणे आता साखर अर्थ संचालक म्हणून, श्री. कोतमिरे हे प्रशासन संचालक म्हणून काम बघणार आहेत.
 

पुणे : राज्याच्या साखर आयुक्तालयात प्रशासकीय बदल झाले असून डी. बी. मुकणे व शैलेश कोतमिरे यांच्याकडे संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. मात्र, उपपदार्थ विभागात काम करण्यास कोणी तयार नसल्यामुळे हा विभाग अजूनही वाऱ्यावर आहे. भूविकास बॅंकेचे अवसायक असलेले अपर निबंधक श्री. मुकणे आता साखर अर्थ संचालक म्हणून, श्री. कोतमिरे हे प्रशासन संचालक म्हणून काम बघणार आहेत.
 
राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या इतिहासात २०१७-१८ हा हंगाम सर्वाधिक नियोजनाचा होता. गाळपासाठी ९५० लाख टनाहून जास्त ऊस उभा होता. जुने साखर कारखाने चालू करण्याचे मोठे आव्हान होते. त्यात पुन्हा कर्जबाजारी साखर कारखान्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून सवलती मिळवून देण्याचे देखील आव्हान आयुक्तालयासमोर होते. आव्हानात्मक स्थितीत देखील विद्यमान साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी प्रशासकीय नियोजन चांगले केल्यामुळे गाळपाचे प्रश्न तयार झाले नाहीत. अर्थात, त्यासाठी आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे संचालक किशोर तोष्णीवाल व अर्थ संचालक राजेश कुलकर्णी यांचे कामकाजदेखील उपयुक्त ठरले. 

साखर आयुक्तालयाचा प्रमुख जरी सनदी अधिकारी असला तरी आयुक्तालयाचा कारभार मात्र सहकार विभागाकडून चालविला जातो. प्रशासकीय बदलांमध्ये श्री. तोष्णीवाल यांना आता अपर निबंधक म्हणून पुण्यात तर श्री. कुलकर्णी हे मुंबईत अपर निबंधक म्हणून कामकाज बघतील. 

प्रशासन सहसंचालक म्हणून गेली काही वर्ष उत्तम कामगिरी बजावणारे अशोक गाडे यांच्या जागेवर आता औरंगाबादचे विभागीय सहनिबंधक आर. पी. सुरवसे यांची नियुक्ती झाली आहे. श्री. गाडे यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार 
समितीच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 
 उपपदार्थ सहसंचालक कार्यालयाचे विस्कळित झालेले कामकाज मात्र अजून पूर्वपदावर आलेले नाही.

आयुक्तालयात उपपदार्थ विभाग वेगळा स्थापन करण्यात आलेला आहे. मात्र, या विभागाला बहुतेक वेळा कोणीही वाली नसल्याचे दिसून येते. तत्कालीन सहसंचालक शरद जरे यांची बदली झाल्यानंतर अनेक महिने उपपदार्थ विभाग वा-यावर होता. शासनाने बी. जे. देशमुख यांची नियुक्ती काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, ते या पदावर काम करण्यास इच्छुक नव्हते. श्री.देशमुख यांची बदली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी झाल्यानंतर उपपदार्थ विभाग पुन्हा ओस पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...