आॅनलाइन अर्ज न केल्यास पीकविम्याचा लाभ नाही : कृषी आयुक्तालय

आॅनलाइन अर्ज न केल्यास  पीकविम्याचा लाभ नाही : कृषी आयुक्तालय
आॅनलाइन अर्ज न केल्यास पीकविम्याचा लाभ नाही : कृषी आयुक्तालय

पुणे:  प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकदम शेवटच्या दिवशी विमा अर्ज भरण्यासाठी गेल्यास गर्दी होऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरता न आल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार नाही, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.  विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै राहील; मात्र बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत २४ जुलै आहे. शेवटच्या दिवशी विमा अर्ज भरण्यासाठी गेल्यास गर्दी होऊन ऑनलाइन अर्ज भरण्यास अडथळा येऊ शकतो, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.   राज्यात खरीप हंगामाचे काम विविध विमा कंपनीकडून आठ जिल्हासमूह क्षेत्रात केले जाणार आहे. यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, वर्धा, ठाणे, परभणी, अमरावती, भंडारा, पुणे  या जिल्ह्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक १८००१०३५४९९) काम बघणार आहे. भारतीय विमा कंपनीला यंदा लातूर, अहमदनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी काम मिळाले आहे. शेतकरी या कंपनीशी ०२२-६१७१०९०० या दूरध्वनीवर किंवा १८०० १०३ ००६१ या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतील.  ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी (१८००११८४८५) बीड, सांगली, नासिक, रायगड, उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांत काम बघणार आहे. याशिवाय आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी (दूरध्वनी ०२०-३९८२०१००) जालना, वाशीम, नागपूर, गडचिरोली, पालघर, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकविम्याचे काम बघणार आहे.  शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. ‘‘बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत देखील सहभागी होता येणार नाही,’’ असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी त्यामुळे मुदतीपूर्वीच बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरून अर्ज सादर करावेत. काही समस्या असल्यास विभागीय कृषीसह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी, तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com