agrowon news in marathi, agri commissioner taken serious to rain data issue, Maharashtra | Agrowon

पावसाच्या चुकीच्या आकडेवारीबाबत कृषी आयुक्तांकडून गंभीर दखल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

पावसाच्या आकडेवारीची चुकीची नोंद ही अतिशय संवेदनशील आहे. ‘महावेध’कडून आलेल्या चुकीच्या माहितीविषयी अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून ही यंत्रणा अचूकपणे कार्यान्वित होईपर्यंत महसूल विभागाकडून प्रचलित पद्धतीने माहिती घेऊन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. 
- सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त
 

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या पावसाच्या आकडेवारीमध्ये चुका असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. चुकीची आकडेवारी येणे ही बाब गंभीर असून, त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. 

राज्यात एकाच ठिकाणी पडलेल्या पावसाच्या दोन वेगवेगळ्या नाेंदी हाेत असल्याचे, तसेच यात मोठी तफावत असल्याची बाब ‘अॅग्रोवन’ने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कृषी विभागाच्या संकेतस्थळ आणि ‘मोबाईल अॅप’वरून पावसाची मंडलनिहाय दैनंदिनी आकडेवारी प्रसिद्ध करणे बंद करण्यात आले. चुकीच्या आणि मोठी तफावत असलेल्या शेतकऱ्यांनी अाक्षेप नोंदविल्यानंतर ही आकडेवारी बंद केल्याने कृषी विभागाच्या नोंदीबाबत संभ्रम आणखी वाढला आहे. 

कृषी विभाग आणि ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘महावेध’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व मंडल स्तरांवर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. यातून मानवी हस्तक्षेप विर.िहत स्वयंचलित पद्धतीने पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेेग, दिशा, आर्द्रता या सर्व नोंदी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत. मात्र, 
काही तांत्रिक कारणामुळे चुकीची आकडेवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

याबाबत कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, की पूर्वी महसूल विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या नोंदी कृषी विभागाला प्राप्त होत होत्या. आता ‘महावेध’ या प्रकल्पाअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. ही स्वयंचलित हवामान केंद्र भारतीय हवामान विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेली आहेत. यातून मिळणाऱ्या नोंदीमध्ये मानवी हस्तक्षेप नसल्याने त्यातील अचूकता वाढणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे सध्या संकेतस्थळावर आकडेवारी प्रसिद्ध करणे बंद झाले आहे, लवकरच ही माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल. 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...