‘कृषी’च्या सेवा प्रवेशात अखेर कृषी पदवीधर

‘कृषी’च्या सेवा प्रवेशात अखेर कृषी पदवीधर
‘कृषी’च्या सेवा प्रवेशात अखेर कृषी पदवीधर

अकोला : शासनाने यावर्षी जानेवारी महिन्यात कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांसाठीचे सेवाप्रवेश नियम बदलले होते.  यामध्ये कृषी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमामधून ‘कृषी पदवीधर' हा शब्द वगळण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव करीत कृषी पदवीधर पात्र असल्याचे पत्रही काढले. मात्र आता ३० जून रोजी याबाबत शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अखेर यामुळे कृषी सहायकांच्या सेवाप्रवेश नियमाबाबतचा गोंधळ संपेल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे. जानेवारीत नियमात केलेल्या बदलांमुळे पदवीधरांमध्ये गोंधळ उडाला होता. त्याची सावरासावर करीत मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी पत्र काढून भरतीसाठी ‘पदवी'' चालेल असे आदेशही दिले होते. दरम्यानच्या काळात राज्यात कृषिसेवक भरती प्रक्रिया राबवल्या गेली. या प्रक्रियेत पदवीधर पात्र ठरल्याने पदविकाधारकांनी जानेवारीतील बदलांचा आधार घेत पदवीधरांबाबत विरोधाची भूमिका घेतली होती. दुसरीकडे कृषिसेवक भरतीवर न्यायालयाने स्टेसुद्धा दिला आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवसांपासून कृषिसेवक भरती रेंगाळली आहे. या प्रकरणात शासनाची चूक झाल्याचे स्पष्ट झाले. ही चूक सुधारण्यासाठी ३० जून रोजी शासनाने कृषी सहायक पदाची नवीन सेवा प्रवेश नियमाची अधिसूचना काढली. त्यामध्ये विद्यापीठाची कृषी अभियांत्रिकी किंवा कृषी वानिकी विषयातील पदवी किंवा समतुल्य अर्हता तसेच कृषी पदविका किंवा कृषी विषयातील त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता अशी सुधारणा केली आहे.   न्यायालयाने स्थगिती दिल्याने शासनाने आपली चूक सुधारल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्याचवेळेस शासनाने कृषी पदवीधर कृषी सहायकांवरील अन्याय अजून दूर केलेला नाही. कृषी पर्यवेक्षक पदाचा सेवाप्रवेश नियम अजून कायम आहे. त्यासंबंधात मोठ्या प्रमाणावर कृषी पदवीधरांनी आक्षेप नोंदविले आहेत. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत या अनुषंगाने कृषी पदवीधर संघटना व कृषी पदविका संघर्ष समितीची बैठकही झाली होती. एका आठवड्यात याबाबत निर्णय घेऊन पुन्हा संघटनांना बोलावतो असे मंत्र्यांनी तेव्हा सांगितले होते. दुर्दैवाने ३१ मे रोजी श्री. फुंडकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे हा निर्णय आता प्रलंबित पडला आहे. याअनुषंगाने विद्यमान कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी समोर येत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com