परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस प्रारंभ

 सगरोळी केव्हिकेतर्फे कृषी अवजार बॅंक आणि पशुवैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
सगरोळी केव्हिकेतर्फे कृषी अवजार बॅंक आणि पशुवैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी  विज्ञान केंद्र आणि क्लेअरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अटकळी (ता. बिलोली ) येथे शुक्रवारी (ता.१८) शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भाडेतत्त्वावरील कृषी औजारे बँक आणि पशुवैद्यकीय सेवेचा प्रारंभ करण्यात आला. संस्कृती संवर्धन मंडळांचे चेअरमन प्रमोद देशमुख अध्यस्थानी होते. उमरी येथील कृषिउद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. विनोद देशमुख, मधुकर पाटील खतगावकर, विनायकराव कुलकर्णी, शाशिकांतराव देशपांडे, तात्यासाहेब देशमुख, आनंदिदास महाजन, गणेश पाटील ढोलउमरीकर, गंगाधर अनपलवार, रामदास शेरे आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस शेतीचे धारणआ क्षेत्र कमी होत आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या वाढत आहे. शेतीकामासाठी पशुधनाचा सांभाळ करणे कठीण होत आहे. मजुरीचे वाढलेले दर तसेच वेळेवर उपलब्ध न होणे आदी समस्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत भेडसावत आहेत. या सर्व बाबीवर मात करण्यासाठी आत्याधुनिक ट्रॅक्टर   चलित नांगर, वखर, बीबीएफ पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पंजी, मळणीयंत्र, कल्टीव्हेटर, मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र, हळद लागवड व काढणी यंत्र, सरी वरंबा पाडणी यंत्र आदी   अवजारे असणारी शेती अवजारे बँक अटकळी (ता. बिलोली) येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा- सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे जातिवंत जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. या बाबींचा विचार करून केंद्रातर्फे शेतकऱ्यांना तज्‍ज्ञ पशुवैद्यकांमार्फत सेवा गोठ्यापर्यंत पुरविण्यात येणार आहेत. या सेवेचा प्रारंभदेखील अटकळी(ता. बिलोली) येथे करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. कपिल इंगळे आणि डॉ. भूषण सदार यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. दत्ता म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रा. व्यंकट शिंदे यांनी मानले. विनोद देशमुख, इंजी. वैजनाथ बोंबले आदींनी पुढाकार घेतला. या वेळी अटकळी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com