agrowon news in marathi, agri technical degree programme will countinue, Maharashtra | Agrowon

कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पूर्ववत सुरू होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बंद झालेला कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यावर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नियम धाब्यावर बसवून कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम बंद केल्याकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम लक्ष वेधले होते. तसेच त्यानंतरही त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. 

मुंबई ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बंद झालेला कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यावर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नियम धाब्यावर बसवून कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम बंद केल्याकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम लक्ष वेधले होते. तसेच त्यानंतरही त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. 

प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार न करता हा अभ्यासक्रम बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणापासून वंचित राहावे लागणार होते. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी तत्कालीन कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे होणारे प्रतिकूल परिणाम निदर्शनास आणून दिल्यानंतर फुंडकर यांनी हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात 18 जून रोजी बैठक घेतली होती. 

‘असोसिएशन ऑफ अॅग्री अॅंड अॅग्रो अलाइड कॉलेजेस’ या संघटनेनेही मुंबई येथे कृषिमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयामुळे ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली होती. कृषिमंत्र्यांनी संघटनेच्या सदस्यांची बाजू समजून घेतली व सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी झालेल्या चर्चेत कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम बंद करण्याच्या कृषी विद्यापीठाच्या निर्णयाचे गांभीर्य आणि त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे मोठे नुकसान कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अखेर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांमधील हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...