agrowon news in marathi, Agrowon Soil Enhancement Seminar in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध करण्याचा मूलमंत्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

 नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक पोषण'' या विषयाला वाहून घेतलेल्या तज्ज्ञांकडून अनुभवसिद्ध मार्गदर्शन मिळण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळत आहे. आज, बुधवारी (ता.२०) येथील सकाळी १० वाजता येथील प. सा. नाट्यगृहात शेतकऱ्यांना माती समृद्ध करण्याचा मूलमंत्र मिळणार आहे. 

 नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक पोषण'' या विषयाला वाहून घेतलेल्या तज्ज्ञांकडून अनुभवसिद्ध मार्गदर्शन मिळण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळत आहे. आज, बुधवारी (ता.२०) येथील सकाळी १० वाजता येथील प. सा. नाट्यगृहात शेतकऱ्यांना माती समृद्ध करण्याचा मूलमंत्र मिळणार आहे. 

शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन''च्या वतीने  बुधवारी (ता.२० ) नाशिकला ‘जमीन सुपीकता'' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नेहरू गार्डन नजीकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यादरम्यान होईल. यारा फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, कॅन बायोसिस हे सहप्रायोजक आहेत. राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालल्याने शेती संकटात आली आहे. हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवनने'' हे जमीन सुपीकता वर्ष जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून हे महत्त्वाचे चर्चासत्र होत आहे.

हे आहेत चर्चासत्राचे वक्ते 
 डॉ. हरिहर कौसडीकर ः
डॉ. कौसडीकर हे सध्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जमिनीचे आरोग्य व पीक पोषण या विषयांवर तसेच कृषि शिक्षणाविषयी पुस्तके लिहिली आहेत. या शिवाय दैनिक ॲग्रोवन मध्ये त्यांची सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन ही लेखमालाही प्रसिद्ध झाली आहे.

  सुभाष शर्मा ः श्री. शर्मा यांना रासायनिक व नैसर्गिक या दोन्ही पद्धतीच्या शेतीचा दीर्घ अनुभव आहे. जपानमधील मासानोबू फुकुओका आणि भारतातील गुजरात मधील शेतकरी भास्कर सावे यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते १९९४ पासून पूर्णपणे नैसर्गिक शेती करीत आहेत. शाश्‍वत शेती पध्दतीतून दर्जेदार पीक उत्पादन घेण्यात त्यांनी सातत्यपूर्ण यश मिळविले आहे.

  प्रताप चिपळूणकर ः श्री. चिपळूणकर हे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी त्याच बरोबर ते भू-सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक आहेत. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी त्यांनी १९९० पासून अनेक प्रयोग केले आहेत. त्यातूनच त्यांनी शाश्‍वत शेतीचे तंत्र विकसित केले आहे. या विषयावरील दैनिक ॲग्रोवनमधील लेखमालेचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

 चर्चासत्राचे नियोजन असे...
 चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती 
 स्थळ ः प. सा. नाट्यगृह, नेहरू गार्डनजवळ, शालिमार, नाशिक.
 दिनांक व वेळ ः बुधवार, २० मे २०१८. सकाळी १० ते दुपारी २

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...