agrowon news in marathi, all opposition came together in solapur APMC, Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समिती निवडणूकीत सहकारमंत्र्यांविरुद्ध विरोधक एकवटले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीची रंगत वाढली असून, राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसह सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या आज मंगळवारी (ता. १९) शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्यात भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखही विरोधी गटात दाखल होत प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांच्यासाठी स्वकियांबरोबर विरोधकांनाही दोन हात करताना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीची रंगत वाढली असून, राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसह सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या आज मंगळवारी (ता. १९) शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्यात भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखही विरोधी गटात दाखल होत प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांच्यासाठी स्वकियांबरोबर विरोधकांनाही दोन हात करताना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जवळपास ३६९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच राजकीय हालचालींनी वेग घेतला होता.

सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सिद्धरामेश्‍वर परिवर्तन पॅनेलची घोषणा करत १५ उमेदवारांची नावे जाहीर केली, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससह पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना सोबत घेऊन सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडी असे स्वतंत्र पॅनेल घोषित केले. त्याशिवाय काही अपक्षांनीही एकत्रित येत या निवडणुकीत लढत देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात मंत्री सुभाष देशमुख यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यानंतर या आपल्याच निर्णयाची आपल्याच जिल्ह्यात आणि स्वतःच्या  मतदारसंघात ते चाचपणी करत आहेत. शिवाय सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांवर अनियमिततेप्रकरणी कारवाईचा बडगा उचलण्यातही अप्रत्यक्षपणे त्यांनी लक्ष घातले. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली असताना त्यांच्या पक्षाचे नेते, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे विरोधकाच्या गोटात दाखल झाले आहेत. ते थेट कुंभारी गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या तरी मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध सर्व अशी लढत रंगली आहे.

नेत्यांविरुद्ध कार्यकर्ते
शेतकऱ्यांच्या मतदानावर १५ गणांतून विविध गटनिहाय १५ संचालक निवडून दिले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने कुंभारीतून पालकमंत्री विजयकुमार देशमुख उतरले आहेत. पण त्यांच्याविरुद्ध भाजपचे पक्षाचेच कार्यकर्ते शिरीष पाटील निवडणुकीत उतरले आहेत. हिरजमध्ये कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप माने रिंगणात आहेत. त्या ठिकाणी भाजपकडून श्रीमंत बंडगर हे त्यांचे जुने कार्यकर्ते त्यांच्या विरोधात उभारले आहेत. भंडारकवठ्यातही माजी आमदार शिवशरण पाटील यांनाही वसंत पाटील हे कार्यकर्तेच भिडणार आहेत. एकीकडे नेत्यांविरुद्ध नेते अशी लढत होत असताना प्रत्यक्षात मैदानात मात्र नेत्यांविरुद्ध कार्यकर्ते अशाच लढती रंगणार असल्याचे दिसते.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...