agrowon news in marathi, Anna Hajare says, again agitation form 2nd October, Maharashtra | Agrowon

दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन ः अण्णा हजारे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

नगर ः डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतगृह उभारावेत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्ताची नेमणूक करावी यासह विविध मागण्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तिसरे स्मरणपत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 

नगर ः डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतगृह उभारावेत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्ताची नेमणूक करावी यासह विविध मागण्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तिसरे स्मरणपत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविलेल्या या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविल्या आहेत. 

पत्रात म्हटले आहे, की सत्तेवर आल्यावर लोकपाल व लोकायुक्त कायदा तत्काळ अमलात आणू व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही लागू करू, अशी आश्‍वासने आपण निवडणूक काळात जनतेला दिली होती. मात्र, सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली, तरीही काहीच कारवाई झाली नाही. मी २३ मार्चला दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले, त्या वेळीही आपण ‘या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊ,’ असे सांगितले. त्यामुळे मी आंदोलन मागे घेतले. त्यालाही तीन महिने लोटले, तरी अद्याप आपण कार्यवाही केलेली नाही. मी यापूर्वी दोन पत्रे पाठवली. त्यांनाही आपण फक्त ‘आपले पत्र मिळाले,’ एवढेच उत्तर दिले.

आता हे तिसरे स्मरणपत्र देत आहे. आमच्या मागण्यांबाबत व आश्‍वासनांबाबत येत्या दोन ऑक्‍टोबरपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास राळेगणसिद्धी येथे दोन ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार आहे

इतर ताज्या घडामोडी
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...
पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर...पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात...
सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग...सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून...